राजेंद्र पाटील राऊत
ग्रामपंचायत शेळगांव (गौरी) येथे शिवस्वराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा..
छत्रपती शिवाजी महाराज याचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे….
प्राचार्य डाँ. मनोहर तोटरे
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज ६ जूनला २०२१ सकाळी ९ वाजता शेळगांव (गौरी) ता.नायगांव ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला आहे. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी
उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला,छत्रपती शिवाजी महाराज याचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे आसे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर यानी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. सूर्यास्ताला राजदंड स्वराज्य गुढी खाली घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.म्हणून हा दिवस शिवराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. शेळगांव नगरीतील या कार्यक्रमाला नवनिर्वाचित सरपंच डाँ.मनोहर तोटरे सर उपसरपंच सौ.शालीनीताई राजेन्द्र पा.शेळगांवकर.राजेन्द्र पा.शेळगांवकर .ग्रामविकास अधिकारी धनराज कत्ते.तलाठी विजय पाटील जाधव.ग्रा.प.सदस्य मोहन मेडाबलमेवार.प्रा.समदानी सय्यद.सौ. सगिंताताई लक्ष्मण कांबळे.अशोक रामराव पा.(तात्या) सुधाकर पाटील.भाऊसाहेब पाटील.गजानन पा.शिंपाळे.नागोराव पाटील.हांणमत वाघमारे.सुभाष उत्तमराव पाटील.संतोष देशमुख.प्रा.बबन काठेवाडे.माधव पा.घाटोळे.नागनाथ पा.शिंपाळे.माणीक पा.घाटोळे.शेषेराव पा,शिंपाळे.श्रीराम वाघमारे,तुकाराम वाघमारे सर.कुन्दंन पा.टेकाळे.बाळु पा.टेकाळे.माधव पा.वाढवणे.मारोती पा.कानोले.सर्जेराव पेन्टंलवाड.जमनाजी इबीतदार. ग्रामपंचायत सदस्य.प्रतिनिधी.गावातील प्रतिष्ठित नागरिक.विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जयघोष करण्यात आला.