Home सामाजिक नंदलाला रे गोपाला–नटखट कान्हा– भाग १

नंदलाला रे गोपाला–नटखट कान्हा– भाग १

159
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0017.jpg

नंदलाला रे गोपाला–नटखट कान्हा– भाग १

अनादी काळापासून हिंदू धर्मात राम आणि कृष्णाची पूजा केली जाते आहे. त्यातही रामचरित्र हे त्याग, एकपत्नीव्रत या सारख्या गुणांनी भरले असूनही रामाला त्याच्या आयुष्यात दु:ख जास्त भोगायला लागले. पण कृष्णावताराच्या बाबतीत मात्र सगळ्या लीलांमध्ये रममाण होऊनही तो मात्र या सगळ्यांतून विरळा राहिल्याचे दिसते.’ माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा भोगी म्हणूनी उपहासा मी योगी कर्माचा” असं गदिमा उगाचच नाही लिहून गेले. गीतेसारखं भलमोठं तत्त्वज्ञान सांगणारा, आपल्या उपस्थितीनेही पांडवांच्या पक्षात विजय आणणारा, 16 हजार नारींचा नाथ बनून त्यांची दृष्ट नरकासुराच्या कैदेतून सुटका करणारा श्रीकृष्ण इतक्या दैवी शक्तींनी युक्त असूनही तो आपल्यातलाच एक वाटतो. म्हणूनच आपल्याला सगळ्या लीलांमध्ये, भोगामध्ये रमलेला कान्हा मात्र ‘मी कर्मयोगी आहे’. असे सांगतानाही आपणाला आश्चर्य वाटत नाही. कारण तो एक पूर्णपुरुष आहे.कृष्ण एक मोठं रसायन आहे. एकीकडे आपल्या बाललीलांनी आपण सामान्य असल्याचे दर्शवताना कंसाने पाठवलेल्या प्रत्येक शक्तिशाली व दृष्ट राक्षसांचा वध तो किती लीलया करतो. आपल्यासारखाच लहानपणी चोरून लोणी खाणारा नटखट कान्हा जेव्हा सगळ्या गोकुळवासियांच्या डोक्यावर गोवर्धनाचे छत धरतो, त्यावेळी त्याचे देवत्व असामान्यत्व समोर येते.कृष्णाला किती उपमा, नाव किती तशी त्याची रूपेही किती? पाळण्यात पाय हलवणारा यशोदेचा ‘लाल’ दुडुदुडू धावणारा गोपिकांचा ‘कान्हा’, राधेचा ‘श्याम’, पेंद्या बलराम यांचा ‘किश्ना’ ही अन अशी कितीतरी रूपे अन नावे. इंद्राच्या कोपापासून गावकर्‍याना वाचवणारा गिरीधर कितीतरी युक्ती प्रयुक्तींनी अज्ञानात असलेल्या त्या गोपजनांना जगण्याचं सार सोप्या भाषेतून, कृतीतून पटवून देतो. बायकांची ताक, दुध, लोणी या सारख्या साध्या ऐहिक गोष्टींवर असलेली आसक्ती सोडवण्यासाठी तो त्यांच्या घरचे लोणी, दूधदुभते चोरतो, मटकी फोडतो.नंद राजाचा मुलगा असूनही त्याला या सगळ्या गोष्टी काय मिळत नसतील? पण आपल्याजवळच आपलं प्रिय इतरांनाही वाटावं, कोणी उचनीच असू नये सर्वांनी मिळून मिसळून राहावं हे आजच्या काळातलं ‘समाजवादी’ तत्वही श्रीकृष्णाने मांडलं. हे शिकवण्यासाठीच कृष्ण गोपालकाल्यापासून गवळणींच्या खोड्या करण्यापर्यंत सारी कृत्ये करत असावा.

रामभाऊ आवारे
प्रदेश कार्याध्यक्ष-वारकरी मंच महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here