Home नाशिक नाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर पाहण्यासाठी लोकांची गर्दी

नाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर पाहण्यासाठी लोकांची गर्दी

137
0

आशाताई बच्छाव

IMG-20230528-WA0047.jpg

नाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर पाहण्यासाठी लोकांची गर्दी

नाशिक :- विजय पवार प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर, पाहण्यासाठी लोकांची गर्दी.नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डॉ. संतोष पाटील या तरुणानं अगदी किल्ल्यासारखं घर बांधलंय. घराच्या बाहेरील बाजूस ऐतिहासिक किल्ल्यासारखा दिसणार घर बांधले आहे. घराच्या चारही बाजूंना बुरुजांचा आकार देण्यात आलाय. घराचा दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा महाकाय आहे. त्याचबरोबर घराच्या बाहेरील बाजूला तोफा बसवण्यात आलेत. प्रवेशद्वारावर दारु पिऊन आणि गुटखा खाऊन येणाऱ्यास प्रवेश नाही असे देखील लिहिण्यात आले आहे.जिल्ह्यातील मालेगावात एका शिवप्रेमी डॉक्टर यांनी हुबेहुब ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर बांधलं आहे.महाराष्ट्रात ग्रामीण भागात अशा पद्धतीची अनेक घरं पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली या गावात सदाशिव पाटील यांनी सुध्दा अशा पद्धतीने अनेक वस्तूंची जपणूक केली आहे. त्यांच्याकडे अनेक शिवकालीन वस्तू आहेत. त्याचबरोबर त्यांनी सुध्दा त्यांच्या घराच्या बाहेर तोफा ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांचं घर सुध्दा अनेक लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र झालं आहे. अनेक लोकं त्यांना खास भेटायला जातात.
काही व्यवसायिकांनी हॉटेल किल्ल्यांसारखे बांधल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांची नावं सुध्दा तशीचं आहेत.तिथं गेल्यानंतर अनेकांना एखाद्या किल्ल्याचा भेट दिल्यासारखं वाटतं आहे. त्याचबरोबर लहान मुलं सुध्दा त्या ठिकाणी भेट देत असून अधिक रमत आहेत.

Previous articleसप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लागू होणार ड्रेस कोड
Next articleनंदलाला रे गोपाला–नटखट कान्हा– भाग १
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here