• Home
  • वडवळ येथे हळदी कुंक आणि महिला मेळावा संपन्न 🛑

वडवळ येथे हळदी कुंक आणि महिला मेळावा संपन्न 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210202-WA0116.jpg

🛑 वडवळ येथे हळदी कुंक आणि महिला मेळावा संपन्न 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खालापूर/रायगड:-⭕ राजे प्रतिष्ठान (कला,क्रिडा,सांस्कृतिक व सामाजिक) आयोजीत महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ 31 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 4.00 वाजता रा.जि.प.शाळा वडवळ येथे मोठ्या धुमधडाक्यात पार पाडला.सदर कार्यक्रमास “मी द्रौपदी बोलते” फेम सौ. प्रेरणा देशपांडे ह्यांनी आपल्या एकपात्री जिवंत अभिनयाने रसिकजनांची मनं जिंकली.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन कोयना समाजाचे मा अध्यक्ष श्री विठ्ठलजी मोरे,श्री विष्णुजी सावंत,श्री एम.डी.चाळके,श्री पांडुरंगजी साळुंखे,उपाध्यक्ष श्री लक्ष्मणजी मरागजे,श्री जितुभाऊ सकपाळ,श्री तुळशीरामजी सावंत, श्री उमेशजी कदम,भाजपा खालापुर तालुका अध्यक्ष श्री शशीकांतजी मोरे,श्री दत्ताजी सकपाळ,श्री सुभाषजी सावंत,श्री संतोषजी सकपाळ तसेच सौ रेश्माताई आंग्रे,सौ अनिताताई पाटील,सौ मिनाक्षीताई लोकरे,सौ वैजयंतीताई गायकवाड,सौ शैलाताई भगत,सौ सुविधांची विचारे श्वेताताई कुंभार आणि पत्रकार श्री समाधानजी दिसले अशा विविध क्षेत्रातील मंडळीनी उपस्थित राहुन कौतुकाची थाप राजे प्रतिष्ठानला दिली.

सदर महिला मेळाव्यास हजारोच्या संख्येने महिला व आबालवृद्ध ह्यांची उपस्थिती नजरेत भरण्या सारखी नेत्रदीपक होती.ह्या कार्यक्रमा अंतर्गत विविध क्षेत्रात अनन्य साधारण कामगिरी करणा-या मुली व महिला ह्यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मोलाचे असे मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमात विधीज्ञा प्रेरणा देशपांडे मॅडमनी द्रौपदीच्या भुमिकेतुन स्त्रीच्या आयुष्यातील विविध पैलूंना उजागर करुन महिला सबलीकरण व सक्षमीकरणावर जोरदार मतप्रदर्शन करुन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाट मोकळी करुन दिली.

सदर कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांचे हळदी कुंकू ने तिलक करुन प्रतिष्ठान च्या वतीने छोटीशी भेट देऊन सन्मान करण्यात आला.शेवटी सर्वांचेच आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.🛑

anews Banner

Leave A Comment