• Home
  • संपुर्ण जिवनात निस्वार्थ रुग्णासेवा करणाऱ्या आईने घेतला वानखेड गावचा निरोप

संपुर्ण जिवनात निस्वार्थ रुग्णासेवा करणाऱ्या आईने घेतला वानखेड गावचा निरोप

आशाताई बच्छाव

IMG-20230204-WA0025.jpg

संपुर्ण जिवनात निस्वार्थ रुग्णासेवा करणाऱ्या आईने घेतला वानखेड गावचा निरोप

संपुर्ण गाव,जिल्हापरिषद शाळा तसेच शिवशंकर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ही वाहिली कलाबाईंना श्रद्धांजली                                         बुलढाणा,स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील रहिवासी असलेल्या कलाबाई तायडे यांना पातुर्डा ते पातुर्डा फाटा येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिली आणि सदर वाहन चालक पसार झाला. घटना स्थळावरून सर्वप्रथम तपासणीसाठी त्यांना शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे रेफर करण्याचे सांगितले. व अकोला येथील डॉक्टरांनी उपचारादरम्यान कलाबाईंना मृत घोषित केले. कलाबाई यांच्या अकाली निधनाने पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही डिग्री अथवा डिप्लोमा नसताना आपल्या अनुभवाच्या जोरावर निष्णात डॉक्टरांनाही विचार करायला लावणारे अचूक निदान काढणाऱ्या कलाबाई. महिलांच्या गरोदरपणाच्या काळात त्यांना रात्रंदिवस निस्वार्थ आणि निशुल्क सेवा देऊन गरोदरपणाच्या महिलांना नेहमी धीर देत कित्येक महिलांच्या प्रसूती त्यांनी आपल्या हाताने गावातच केल्या. निरक्षर असून सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातल्या अनुभवाच्या जोरावर रुग्णाच्या सेवेत त्यांना स्वतःचा आत्मविश्वास होता हे मात्र खरे….
कलाबाई तायडे यांच्या अकाली जाण्याने आज वानखेड मधील सर्व व्यापारी दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे वानखेड येथिल श्री शिवशंकर विद्यालय,जिल्हा परिषद मुलांची शाळा, जिल्हापरिषद मुलींची शाळा येथे त्यांना राष्ट्रगीतानंतर कालाबाईंना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच वानखेड येथिल भाजपा.बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख यांनी तायडे परिवाराला भेट देऊन सांत्वन केले. व ज्या कोण्या अज्ञात वाहनाने कलाबाईना धडक दिली असेल तामगाव पोलिसांनी त्याचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

anews Banner

Leave A Comment