Home बुलढाणा मोताळ्यात काँग्रेसला मोठे खिंडार आठ नगरसेवकांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश लवकरच मोताळा...

मोताळ्यात काँग्रेसला मोठे खिंडार आठ नगरसेवकांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश लवकरच मोताळा नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकणार

98
0

आशाताई बच्छाव

IMG-20230204-WA0041.jpg

मोताळ्यात काँग्रेसला मोठे खिंडार आठ नगरसेवकांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश लवकरच मोताळा नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकणार
संजय पन्हाळकर युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी
मोताळा: राज्यात सध्या पक्ष प्रवेशाच्या मालिका सुरू असूनच् यामध्ये शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे.राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाची ताकद महाराष्ट्रात वाढत आहे.एक दीड वर्षांपूर्वी मोताळा नगरपंचायतीची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये काँगरेसने सतरा जागेपैकी त्या जागेवर विजय मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली तर शिवसेनेला चारच जागा मिळवता आल्या.यानंतर नगरपंचायत मध्ये काँग्रेसच्या देशमुख विराजमान झाल्या.मात्र गत काही महिन्यापासून काँग्रेसच्या नगरसेवक व नगराध्यक्षांमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली.त्यामुळे मोताळा शहराचा सर्वांगीण विकास ठप्प झाला शिवसेनेचे चार प्रभाग वगळता कुठल्याही प्रभागात विकास न झाल्याने नाराज आठ नगरसेवकांनी धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये शेख तसलीम शेख सलीम बाबा, शहनाज बी शेख सलीम चुने वाले उपाध्यक्ष, पुष्पा चंपालाल जैन गटनेता.खातून बी शेख रशीद.सौ शीला ताई कैलास खर्चे.सौ सरिता विजय सुरडकर. प्रवीण बी शेख आसिफ अशा आठ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.या प्रवेशावेळी युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड जिल्हाप्रमुख ओम सिंह. राजपूत माजी नगराध्यक्ष सौ पूजाताई संजय गायकवाड, प्रदीप जैन, हाजी सलीम बाबा, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रवेशामुळे मोताळा नगरपंचायत मध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून.मोताळा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात जाण्याच्या वाटेवर असून मोताळा नगरपंचायत वर लवकरच शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Previous articleभ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार अँटी करप्शन च्या जाळ्यात
Next articleसंपुर्ण जिवनात निस्वार्थ रुग्णासेवा करणाऱ्या आईने घेतला वानखेड गावचा निरोप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here