Home जळगाव व्हॉटसअपवर व्हिडीआचे स्टेट ठेवल्याच्या कारणातून एकास मारहाण-पाच जणांच्या विरोधात गुन्हा

व्हॉटसअपवर व्हिडीआचे स्टेट ठेवल्याच्या कारणातून एकास मारहाण-पाच जणांच्या विरोधात गुन्हा

41
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230930-185815_Google.jpg

व्हॉटसअपवर व्हिडीआचे स्टेट ठेवल्याच्या कारणातून एकास मारहाण-पाच जणांच्या विरोधात गुन्हा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – आरक्षण मागत असल्याबाबतचा व्हिीडीओ स्टेटस ठेवल्याच्या कारणातून तालु्नयातील एका गावातील तरूणाला पाच जणांनी बेदम मारहाण करून पाहून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील तरुणाने आपल्या मोबाईलच्या व्हॉटसअपवर मेसेज ठेवल्याच्या रागातून मोबाईलवरून धमकी देत रस्त्याने अडवून चापटा बुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली व तु एकटा भेट तुला पाहतो अशी धमकी दिली. मारहाण होणाऱ्या तरूणाला इतर गावकऱ्यांनी मारहाणीपासून सूटका केली. ही घटना आज दि.30 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाघळी गावाजवळ घडली.या प्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous articleचाळीसगावात शासकीय कार्यालयांमध्ये आता दर सोमवारी नागरीकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देणार
Next articleसमता सैनिक दलाची चाळीसगाव शाखेने आयोजित केलेली संघर्ष रॅलीसाठी उत्साहात संपन्न….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here