Home विदर्भ मुंगळा येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार

मुंगळा येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार

124
0

राजेंद्र पाटील राऊत

मुंगळा येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे युवा मराठा न्युज नेटवर्क
कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग आणि मुंगळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने लसीकरण मोहीम जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आली. या मोहिमेत 30 वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
सरपंच सौ.शुभांगी प्रविण वायकर, उपसरपंच नंदकिशोर प्रभाकर वनस्कर यांच्या नेतृत्वाखाली गावात लसीकरणा बाबत जनजागृती केली. ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.निता संजय राऊत, शुभानंद देवलाल बेलोकर, जिप मुख्याध्यापक बाबाराव गिऱ्हे, आरोग्य सेविका बोदवडे, पल्लवी तेलगोटे, रामकिसन चोखारे, माजी पंचायत समिती सदस्य उध्दव राऊत, सामाजिक कार्यकर्ते प्रविण वायकर, संजय राऊत, दशरथ खुळे, गजानन सोनूने गुरुजी, नेहरू युवा मंडळाचे उपाध्यक्ष सुनील नखाते, ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल केळे, दिलीप मांगाडे आदींची उपस्थिती होती.

Previous articleमा. खा. भावना ताई गवळी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले नगर उथाण रस्ते विकास योजने
Next articleस्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घ्या – एसएफआय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here