Home नांदेड स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घ्या –...

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घ्या – एसएफआय

110
0

राजेंद्र पाटील राऊत

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घ्या – एसएफआय

विद्यार्थी नेते पवन जगडमवार यांनी आजपासून मुखेड तहसिल समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणास तालुक्यातील विविध पक्ष,विद्यार्थी संघटनांंनी पाठिंबा दिला आहे

मुखेड / प्रतिनिधी मनोज बिरादार
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या बी.ए,बी.काॅम,बी.एस.सी च्या उन्हाळी परीक्षा २०२१ या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने या निर्णयाने मुखेड सारख्या डोंगराळ भागातील खेडे ,तंडे सारख्या गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्ष देण्यासाठी अनेक अडचणी येणार आहेत.ऑनलाईन परीक्ष देण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांन कडे आजही चांगले अँड्राईड मोबाईल नाहीत.तर अनेक गावात मोबाईल टावर नाहीत.त्यामुळे अनेक गावात नेटवर्क ही येत नसल्याने ग्रामीण भागात इंटरनेट सेवा चालत नाही.सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सतत पाऊस चालू राहतो.त्यामुळे ग्रामीण भागातील विज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडीत केला जातो.यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल चार्जिंग करण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी येतात.आणि त्याचा परीणाम परीक्षे वर होऊ शकतो.आणि ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुसकसान होऊ शकते.यामुळे नांदेड विद्यापीठाच्या परीक्षा या ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घ्या.या मागणी साठी एसएफआय मुखेड तालुका कमिटीचे तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी नेते पवन जगडमवार यांनी दि २१ जून पांसुन मुखेड तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषणाला बसले आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून उच्चशिक्षण मंत्री व कुलगुरू यांनी ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही परीक्षा पद्धतीला परवानगी देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावे.हि मागणी घेऊन शाहीर महाविद्यालयाचे विद्यार्थी नेते पवन जगडमवार हे मुखेड तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.यावेळी एसएफआय चे जिल्हाध्यक्ष विजय लोहबंदे , डिवायएफआय चे अंकुश माचेवाड ,यु.नर्सिंग असोसिएश्न चे जिल्हा अध्यक्ष आदी बनसोडे ,प्रहारच जनशक्ती पक्षाचे सचिव गोपाळ पाटील हिवराळे जाहुरकर सतिष पाटील शिंदे केरूरकर,रोहित पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर,पत्रकार रणजित जामखेडकर, स्वाभीमानी संभाजी बिग्रेड चे वैभव पाटील राजूरकर , यौगेश पा.जांबळीकर, संग्राम पा.तांदळीकर यांनी उपोषणाला पाठींबा दिला.यावेळी वैभव गायकवाड,अविनाश घाटे,लक्ष्मण इबितदार,भवन कोद्रे,परमेश्वर इबितदार आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleमुंगळा येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार
Next articleजाहूर परिसरात खरीप हंगामातील पिकावर गोगल गाईंचा मोठ्या प्रमाणात हल्ला. मोड आलेली अंकुर खाऊन करत आहेत फस्त..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here