• Home
  • 🛑 महाराष्ट्र नवनिर्माण शाखा १०९ भांडुप मुंबई तर्फे शाहीर राजू धावडे यांचा सत्कार 🛑

🛑 महाराष्ट्र नवनिर्माण शाखा १०९ भांडुप मुंबई तर्फे शाहीर राजू धावडे यांचा सत्कार 🛑

🛑 महाराष्ट्र नवनिर्माण शाखा १०९ भांडुप मुंबई तर्फे शाहीर राजू धावडे यांचा सत्कार 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕कोकिसरे बांधवाडी सुपुत्र शाहिर राजू धावडे (तालुका -वैभववाडी -जिल्हा -सिंधुदुर्ग)शाखा बांधवाडी शिंगुदेवी युवा मंडळ (मुंबई). लहान पनापासून नाच गाण्याची आवड.सगळीच माणसे सर्व गुण संपन्न असतातच असे नाही.पण काही अपवाद असतात त्यातलेच एक शाहिर राजू धावडे.

त्यांचा पहाडी आवाज तेवढंच मायाळू मन, प्रेमळ स्वभाव, एक जिद्द घेऊन हा कलाकार प्रयत्न करतोय जसे कि जाखडी नाच. हा नाच खेड चिपळूण ते राजापूर पर्यन्त पण त्यांना पार चांदा ते बांदा पर्यंत घेऊन जायचंय.का तर ही आपल्या मातीतली कला आहे आणि ती जिवंत राहिली पाहिजे. त्यांना अनेक सन्मान पुरस्कार मिळाले आहेत. कित्येक गाणी you ट्यूब वर गाजत आहेत. संगीताची जान त्यातले बारकावे शोधून आपला आवाज कोणत्याही पट्टीत बेमालूम बसवणारे आपले लाडके शाहिर श्री राजू धावडे.

यांनी जे काम हाती घेतले आहे ते पूर्ण व्हावे आणि अशीच त्यांची घौडदौड चालू राहावी हिच मनापासून इच्छा.मुंबईसारख्या शहरामध्ये जन्मास येऊन शक्तीतुरा कलेमध्ये शंभूराजू घराण्यातील गुरुवर्य शिवराम विठोबा कॅसेट किंग शाहिर रामचंद्र घाणेकर सुधाकर गवाणकर आणि त्यांचे वस्ताद शाहिर सदानंद सरवंदे ,सुधाकर मास्कर या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज शाहिर राजू धावडे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 109 भांडुप तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी.नगरसेविका अनिषा(ताई )माजगावकर,योगेश भाई सावंत (मनसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ),राजाराम गव्हाणे (उपविभाग अध्यक्ष),संदीप कुंभार (शाखा अध्यक्ष ),मोहन चिराथ (शाखा अध्यक्ष ),सुनिल नारकर (शाखा अध्यक्ष ), आनंदी भारती (शाखा अध्यक्ष ),जगु गोसावी (उपविभाग अध्यक्ष ),अंकुश कोळेकर(उपशाखा अध्यक्ष ), दिगंबर शितप,सुनिल शिंदे, समिर जाधव,अविनाश विचारे, राजाराम पलांडे,सचिन घाणेकर दामू वारंग सर्व मनसे कार्यकर्ते,महिला पदाधिकारी, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष, मनसे सैनिक या सर्वांच्या उपस्थितीत सन्माननिय शाहिर श्री.राजूजी धावडे बुवा यांना युवा शाहिर सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.⭕

anews Banner

Leave A Comment