Home परभणी जिंतूर येथील न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिंतूर येथील न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

116

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0076.jpg

जिंतूर येथील न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

जिंतूर तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्टला सकाळी १०. ३० वाजता जिंतूर येथील न्यायालय परिसरात या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या अदालतीत सर्व प्रकारची तडजोड पत्रे, फौजदारी प्रकरणे, भारतीय चलन, चलनक्षम दस्तावेज अधिनियम, वीजचोरी प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे, घरपट्टी, बँकांचे वसुली वाद पूर्व प्रकरणे आदी प्रकारची दिवाणी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. त्यात तडजोडीअंती अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. आर. पनाड, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. व्ही. ए. सोनवणे, उपाध्यक्ष अॅड. एम. डी. जोशी, सचिव अॅड. एम. व्ही. , दाभाडे यांनी केले आहे.

Previous articleकै.डाॅ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Next articleहर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मोफत तिरंगा ध्वज वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.