Home Breaking News 🛑 पुणे – पिंपरी चिंचवड ३ सप्टेंबर पासून….! पीएमपीची प्रवासी बससेवा 🛑

🛑 पुणे – पिंपरी चिंचवड ३ सप्टेंबर पासून….! पीएमपीची प्रवासी बससेवा 🛑

99
0

🛑 पुणे – पिंपरी चिंचवड ३ सप्टेंबर पासून….! पीएमपीची प्रवासी बससेवा 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची प्रवासी बससेवा 3 सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी घेतला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी दिली. पीएमपीच्या 25 टक्के बस पहिल्या टप्प्यात रस्त्यावर धावतील.

पीएमपीची वाहतूक सुरू करण्याबाबत पुणे महापालिकेतून गुरुवारी ऑनलाइन बैठक झाली. या प्रसंगी महापौर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पुण्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडत आहेत.

तसेच, गणेशोत्सवात रस्त्यावर नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे बससेवाही गणेशोत्सव पार पडल्यावर सुरू करावी, असा सूर बैठकीत उमटला होता. दरम्यान स्वारगेट, मनपा, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, हडपसर, कात्रज, माळवाडी, कोथरूड, वाघोली, निगडी, भोसरी, पिंपरी, चिंचवड आदी गर्दीच्या स्थानकांवरून गर्दीच्या वेळात जादा 120 शटल बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असतील, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

पीएमपीची दोन्ही शहरांतील वाहतूक 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद केली आहे. 25 मार्चपासून प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची वाहतूक सुरू आहे.

त्यात सध्या 250 बस दररोज दोन्ही शहरांत धावत आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे पीएमपीचे गेल्या पाच महिन्यांत सुमारे 225 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पीएमपीचे सुमारे पाच हजार कर्मचारी दोन्ही महापालिकांत प्रतिनियुक्तीवर पाठविले आहेत.

अशी होणार बससेवा सुरू
पुणे-पिंपरीतील 190 मार्गांवर 480 बस धावणार
प्रत्येक बसमध्ये कमाल 22 प्रवासी असतील.

प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाईज करणार
बसमधील वातानुकूल यंत्रणा बंद ठेवणार
प्रत्येक बसमध्ये सीटवर मार्किंग होणार….⭕

Previous article*इचलकरंजी आगारात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार*
Next article🛑 कोयनेचे सहा….! वक्र दरवाजे दीड फुटाने उचलले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here