• Home
  • *इचलकरंजी आगारात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार*

*इचलकरंजी आगारात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार*

*इचलकरंजी आगारात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार*

*कोल्हापूर प्रतिनीधी (युवा मराठा न्युज )*

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी.बंस बंद असलेली सेवा पुन्हा सुरू झालेली आहे.पण अद्याप प्रवाश्यांची कमतरता भासत आहे.
त्यामुळे काही फेऱ्या रद्द करण्यात येत आहे.
पण सद्या चालक वाहकांना अँलोकेशन अधिकारी नाहक त्रास देत आहेत.
चालकवाकांना गरजे पुरते न बोलवता भरमसाट ड्युट्या लावून २५ ते ३० कि.मी.वरून चालक वाहकांना नोकरी साठी फाफलत यावे लागत आहे.
पण कामावरती येऊन ही काम न करताच घरी परत जावे लागत आहे.
काही अधिकारी चालकांना अरेरावीची भाषा वापरून नाहक त्रास देत आहेत. चालकांचे ऐकायला मला काय गरज नाही मि सांगतोय तेच ऐकायला पाहीजे अशी अधिकाऱ्यांचे बोलणे चालकांना सहन करावे लागत असुन चालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सद्या कोरोनाच संसर्ग वाढतच आहे त्यामुळे गरजे पुरतेच चालक वाहकांना ड्युटी लावावी.
यामध्ये ५० ते ५५ वयाचे चालक वाहकांना ड्युटी लावली जात आहे.
वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना
गरजेनुसारच कर्तव्यास बोलवावे.
इतर जादा चालक वाहकांना बोलवून कोरोनाला बळी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एखाद्या वाहकाला कोरोनाचा संसर्ग झाला तर बसमधिल सर्व प्रवासी , आगारातील कर्मचारी , अधिकारी या सर्वांना लागण होऊन कोरोना बाधितांची संख्या वाढतच राहील याची दक्षता घेण्याची गरज आहे.
प्रवासी कमी अन चालक वाहकांची संख्या जास्त दिसत आहे.

*ड्युटी लावलेस आम्ही कर्तव्यास हजर राहु पण कामावरुन काम न* *करताच परत जाव लागत आहे ,असे* *चालक वाहकांतुन चर्चा* *होत आहे.*

*याकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष* *घालणे गरजेचे आहे.*

anews Banner

Leave A Comment