• Home
  • 🛑 कोयनेचे सहा….! वक्र दरवाजे दीड फुटाने उचलले 🛑

🛑 कोयनेचे सहा….! वक्र दरवाजे दीड फुटाने उचलले 🛑

🛑 कोयनेचे सहा….! वक्र दरवाजे दीड फुटाने उचलले 🛑
✍️ पाटण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पाटण :⭕ कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे असून धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण सरासरी प्रतिसेकंद ३६ हजार ६५९ क्यूसेक इतके झाले आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.२०) बंद करण्यात आलेले सहा वक्र दरवाजे शुक्रवारी (दि.२१) सकाळी पुन्हा एकदा दीड फुटाने उचलण्यात आले आहेत.

या दरवाजातून प्रतिसेकंद ९ हजार ८५७ तर पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २ हजार १०० असे एकूण प्रतिसेकंद ११ हजार ९५७ क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे कोयना तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना, नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

१०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता व सध्याचा ९३.८७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जवळपास संपुष्टात येत असलेली पाणी साठवण क्षमता व गुरुवारी दुपारपासून सुरु झालेला पाऊस यामुळे शुक्रवारी सकाळी धरणाचे दरवाजे उचलण्यात आले आहेत. पावसाचा जोर वाढून धरणात पाणी आवक वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी वर उचलून त्यातून ज्यादा पाणी सोडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.⭕

anews Banner

Leave A Comment