Home Breaking News 🛑 ”या” आहेत गणपती विसर्जनादरम्यानच्या सूचना 🛑

🛑 ”या” आहेत गणपती विसर्जनादरम्यानच्या सूचना 🛑

106
0

🛑 ”या” आहेत गणपती विसर्जनादरम्यानच्या सूचना 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 22 ऑगस्ट : ⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व शासनस्‍तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्‍यात आले आहे. या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी गणेशोत्‍सव – २०२० साजरा करताना विसर्जनादरम्‍यान पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचना.

➡️ घरगुती गणेशोत्‍सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

➡️ मुंबई शहरात एकूण ७० नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना थेट पाण्‍यात जावून मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

➡️ नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

➡️ नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७० कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर जाण्‍यास मनाई असल्‍याने सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.

➡️ महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत. त्‍याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्‍त्‍यासह तसेच गुगल लोकेशनसह महापालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे.

➡️ प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सिल्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

➡️ मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

➡️ महापालिकेने विशेष व्‍यवस्‍था म्‍हणून ट्रकवर टाक्‍या किंवा इतर व्‍यवस्‍था करुन फिरती विसर्जन स्‍थळे (mobile spots on wheel) निर्माण केलेली आहेत, त्‍याचाही लाभ भाविकांनी घ्‍यावा.

➡️ २०२० गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

➡️ विसर्जना दरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर, मास्‍क/मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी आरोग्‍य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात येत आहे.⭕

Previous article🛑 कोयनेचे सहा….! वक्र दरवाजे दीड फुटाने उचलले 🛑
Next article🛑 नीट २०२० परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती विद्यार्थ्यांना लवकर कळणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here