Home मुंबई खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती

खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती

89
0

राजेंद्र पाटील राऊत

खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५०% टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कडक उपाययोजना करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.
राज्य शासनाने परिपत्र काढून नाट्यगृहे (सिनेमागृहे) व सभागृहे यामधील देखील उपस्थिती देखील ५०% असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने १७ मार्च रोजी यासंदर्भात परीपत्रक काढलं आहे. त्यामध्ये, कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Previous articleवडगांवमधील व्यापाऱ्याची नैराशातुन आत्महत्या
Next articleकै .मधूकररावजी पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेटसामन्यांचे बक्षीस वितरण सम्पन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here