Home कोल्हापूर वडगांवमधील व्यापाऱ्याची नैराशातुन आत्महत्या

वडगांवमधील व्यापाऱ्याची नैराशातुन आत्महत्या

114
0

राजेंद्र पाटील राऊत

वडगांवमधील व्यापाऱ्याची नैराशातुन आत्महत्या

पेठ वडगांव : येथील बिरदेव चौकातील नामांकीत नाझरे बंधू यांचे कृष्णा बँग्ज या दुकानात सुर्यकांत महादेव नाझरे (वय ५५वर्षे ) या व्यापाऱ्याने सिलींग फँनला नायलाँन दोरीच्या साह्यायाने गळफास लावुन आत्महत्या केली.
सविस्तर माहीती अशी सुर्यकांत नाझरे रा.यादव काँलनी पेठ वडगांव ता.हातकणंगले यांचे बिरदेव चौक येथे कृष्णा बँग्ज नावाचे दुकान आहे.ते आज सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडणेसाठी आले व साफसफाई करून पुन्हा दुकानाचे शटर बंद करून त्यांनी दुकानात नैराशातुन नायलाँनच्या दोरीच्या साह्यायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुकान उघडून परत बराच वेळ बंद असल्याने सदरचा प्रकार तेथील रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने तात्काळ नंदकिशोर नाझरे यांना कळविले.
अद्याप आत्महत्येचं नेमके कारण समजु शकले नाही.
घरामध्ये कसलाही वादविवाद व तंटा तसेच कसलेही कर्जाचे दडपण नव्हते तरी त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले यामुळे त्यांच्या परिवारातुन व व्यापारी वर्गातुन हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी व चार भांवडे असा मोठा परिवार आहे.
अधिक तपास वडगांव पोलिस ठाण्याचे पो.हे.काँ. दुकाने , व रेणूशे करीत आहेत.

Previous articleनांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल – पालकमंत्री श्री अशोकराव चव्हाण
Next articleखासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here