• Home
  • 🛑 शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कूलच्या विद्यार्थीचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश 🛑

🛑 शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कूलच्या विद्यार्थीचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश 🛑

🛑 शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कूलच्या विद्यार्थीचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:- ⭕रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे गावातील शारदा विहार माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी कुमारी श्रुतिका प्रमोद जाधव आणि अनुष्का मंगेश शिंदे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन फेब्रुवारी २०२०या परीक्षेत अनुष्का आणि श्रुतिका यांनी सहभाग घेतला होता.

या परीक्षेत अनुष्का मंगेश शिंदे हिला ६७.३६% टक्के तर श्रुतिका प्रमोद जाधव हिला ६३.८८% टक्के गुण मिळून यश प्राप्त केले आहे.

या विद्यार्थीना शारदा विहार माध्यमिक विद्यालयाचे अनिल उतेकर सर यांनी मार्गदर्शन केले.तसेच देशमाने सर, भंडारे सर,गावडे सर, भुजबळ मॅडम आणि रोहित उतेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.अनुष्का आणि श्रुतिका यांच्या यशाबद्दल चोरवणे -निवे-सापिर्ली पंचक्रोशीमधून ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.⭕

anews Banner

Leave A Comment