• Home
  • देगलूर येथे प्रबोधनात्मक व लोकोपयोगी कार्यक्रमाने महापुरुषाची जयंती साजरी करणार – अशोक कांबळे

देगलूर येथे प्रबोधनात्मक व लोकोपयोगी कार्यक्रमाने महापुरुषाची जयंती साजरी करणार – अशोक कांबळे

देगलूर येथे प्रबोधनात्मक व लोकोपयोगी कार्यक्रमाने महापुरुषाची जयंती साजरी करणार – अशोक कांबळे

राजेश एन भांगे

फुले-शाहू-आंबेडकर युवा मंच तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अखंडितपणे मोठ्या हर्षोउल्हासामध्ये साजरी करण्यात येत आहे.
या वर्षी कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनात्मक व लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे आयोजक अशोक कांबळे यांनी संगितले.

दरसालाप्रमाणे ११ एप्रिल रोजी फुले-शाहू-आंबेडकर युवा मंच तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नित्यनियमाने करत आलेलो आहोत. यावर्षी सुद्धा ११ एप्रिलच्या ऐवजी १३ एप्रिलला सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम व १४ एप्रिलला सर्व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून शांतपनाने भव्य-दिव्य अशी मिरवणूक काढावयाचे निश्चित केले आहे.
तसेच याशिवाय लोकोपयोगी कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी आम्ही सामूहिक विवाह सोहळाचा कार्यक्रम शहरात प्रथमत: घेतला होता, त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर र्षभराच्या काळात गोरगरीब-सामान्य जनता खूप परेशान झालेली आहेत. आर्थिक तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. गाव पातळीवरील सामान्य जनता उपवर झालेल्या मुला मुली करिता नाहक अडचण होत आहे.

त्यामुळे येणाऱ्या तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने आम्ही वधू-वर सामूहिक विवाह सोहळा घेणार आहोत. या मध्ये शासनाने व प्रशासनाने सांगितलेल्या अटीस अधिन राहून विवाह सोहळा घेण्याचे उद्देश आहे. तरी गरजू आणि इच्छा असणाऱ्यांनी आमच्याकडे संपर्क करावा असे आयोजक अशोक कांबळे यांच्या तर्फे सांगण्यात आले.

anews Banner

Leave A Comment