• Home
  • *भारतात लॉकडाऊन संपल्यावरच क्रिकेट सुरू होणार -सौरभ गांगुली**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️) करोनाचा धोका संपुष्टात आला व लॉकडाऊनही संपुष्टात आले

*भारतात लॉकडाऊन संपल्यावरच क्रिकेट सुरू होणार -सौरभ गांगुली**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️) करोनाचा धोका संपुष्टात आला व लॉकडाऊनही संपुष्टात आले

**भारतात लॉकडाऊन संपल्यावरच क्रिकेट सुरू होणार -सौरभ गांगुली**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
करोनाचा धोका संपुष्टात आला व लॉकडाऊनही संपुष्टात आले तरच देशांतर्गत क्रिकेट सुरू करता येईल, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्‍त केले आहे.
बुधवारपासून इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाल्याने क्रिकेट खेळत असलेल्या सर्व देशांना दिलासा मिळाला आहे. त्याच प्रमाणे भारतात पण या खेळाचे मोठे चाहते आहेत ,ते सुद्धा आपल्या देशात क्रिकेट कधी सुरू होते अशी आस धरून बसले आहेत मात्र ,देशात करोनाचा धोका अद्याप कायम आहे तसेच सीमाबंदी व प्रवासबंदीही काही राज्यांनी कायम ठेवली आहे. अशा स्थितीत सामने सुरू झाले तर खेळाडूंना विविध ठिकाणी प्रवास करणे शक्‍य होणार नाही, त्यामुळे सध्यातही परिस्थितीचा केवळ आढावा घेतला जात आहेव या परिस्थितीचा पूर्ण विचार केला जात आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.

anews Banner

Leave A Comment