• Home
  • नांदेड शासकीय रूग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

नांदेड शासकीय रूग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

नांदेड शासकीय रूग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोवीड-१९ रूग्णांची संख्या वाढत आहे. याचवेळी नांदेडमध्ये शासकीय कोवीड उपचार रूग्णालयात बेड उपलब्ध नाहीत अशा अफवा पसरल्या आहेत.
त्यामुळे मी आज स्वत: या रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या रूग्णालयात पुरेसे बेड आवश्यक औषधे उपलब्ध असून नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही.
विशेष म्हणजे नांदेड – वाघाळा मनपाचे आयुक्त श्री. सुनील लहाने हेही येथेच उपचार घेत आहेत.
परंतू आजच्या पाहणीत एक बाब माझ्या निदर्शनास अशी आली की काही लोक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांना आवश्यकता नसतानाही या रूग्णालयात एडमिट होत आहेत. अशांनी बेड अडवून ठेवल्यास ज्यांना आवश्यकता आहे त्यांना बेड उपलब्ध होणार नाहीत.

आज मी प्रत्यक्ष पाहणी करून बेड अडवून ठेवलेल्या १० ते १२ जणांना रूग्णालयातून सुटी देऊन घरी पाठवले आहे त्यांच्यावर सहजपणे घरी उपचार केले जाऊ शकणार आहेत.

पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करतो की आजार लपवू नका सौम्य लक्षणे आढळली तरी कोरोना टेस्ट करून घ्या.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या.
आवश्यकता असल्यास आपल्याला रूग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केले जातील अनावश्यक काळजी करू नका.

माञ कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, इतरांपासून शारिरीक अंतर राखणे आणि सतत सॅनिटायजरचा वापर करावे असेही डॉ. विपीन इटणकर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले आहे.

anews Banner

Leave A Comment