Home नाशिक नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20230120-WA0025.jpg

नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज)
देवळाली गावात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या वादात एकाने हवेत गोळीबार केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही गटाचे समर्थक तलवारी, कोयते, लाठ्या-काठ्या घेऊन परस्परांच्या अंगावर धाऊन गेले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
शिवजयंतीच्या नियोजनासाठी देवळाली गावातील गणपती मंदिराजवळ सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सव समितीवर शिंदे गटात सहभागी झालेल्या लवटे गटाचे वर्चस्व आहे. या बैठकीचे निमंत्रण एका गटाला दिले नसल्यावरून वादाची ठिणगी पडली. अलीकडेच ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक भैय्या मणियार आणि लवटे समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आल्याचे सांगितले जाते. दोन्ही गटाचे समर्थक तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन परस्परांवर चालून गेले. यावेळी हवेत गोळीबार झाल्याचे सांगितले जाते. या घटनाक्रमाने परिसरात धावपळ उडाली. दुकाने बंद झाली.
पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अतिरिक्त कुमक मागवली गेली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. देवळाली गाव, नाशिकरोड परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या भागांत दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन गटांतील वादात हवेत गोळीबार झाला असून संशयितास ताब्यात घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. पोलिसांकडून अन्य संशयितांची धरपकड सुरू आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Previous articleआजची मेजवानी (शुक्रवार २० जानेवारी)
Next articleयुवा मराठा विशेष रात्रीचा गोंधळ बराच होता!ग्रामसेवकांची हमरीतुमरी(सांगण नही पन सांगण वन)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here