Home भंडारा बांधकाम मंत्र्यांनी जाणून घेतल्या इंजिनिअर असोसिएशनच्या समस्या!

बांधकाम मंत्र्यांनी जाणून घेतल्या इंजिनिअर असोसिएशनच्या समस्या!

144

आशाताई बच्छाव

IMG_20231108_173340.jpg

बांधकाम मंत्र्यांनी जाणून घेतल्या इंजिनिअर असोसिएशनच्या समस्या!

मंत्रालयात पार पडली बैठक

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) बांधकाम क्षेत्रात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. विभागीय स्तरावरच्या अनेक ज्वलंत समस्या डावलून दुजोरा केला जातो. नेमक्या त्याच संदर्भाचा पाठपुरावा महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चौहान यांना पत्रव्यवहार करून अवगत करून दिले होते. पत्राची दखल घेत चौहान यांनी ६ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात पोडोळे यांच्या यांच्यासह विभागाशी संबंधित मुख्य सचिव साळुंखे, मुख्य सचिव दशपुत्रे, अवर सचिव चिवटे तसेच प्रमुख अधिकारी यांची बैठक घेतली. त्यावेळी संपूर्ण राज्यात सिव्हिल अभियंत्यांना काम करते वेळी उद्भवणाऱ्या चौहान यांनी जाणून घेतल्या. बांधकाम विभागात ३३ कामांचे सु बे यांना वाटप करण्यात प्रशासकीय यंत्रणा कमकुवत ठरते. त्याचा फायदा बेरोजगारांना मिळत नाही असे अनेक प्रश्न पडोळे यांनी चौहान यांच्या समक्ष मांडले. त्यावर साचिवांशी चर्चा करून उद्भवलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यावेळी असोसिएशनचे राज्य महासचिव एम ए हकीम, उपाध्यक्ष सुधीर मानकर, नारायण चौधरी, नांदेड जिल्हाध्यक्ष नारायण बारस्कर, ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी अभियंते उपस्थित होते.
——————
सु बे अभियंत्यांना दिला भरवसा
– बांधकाम मंत्री चौहान यांनी सदर बैठकीत उपस्थित मुद्यांना प्राधान्य देऊन राज्यभरातील सु बे अभियंत्यांना असोसिएशनचे माध्यमातून अश्वस्त केले. एकूण कामांच्या नियोजनातील ३३ टक्के कामे ही सू बे अभियंत्यांना वाटप करण्याबाबत सक्तीचे शासन निर्णय लवकरच काढणार असल्याचा दिलासा चौहान यांनी त्यावेळी दिला.
——————
कार्यकारी अभियंत्यांच्या बैठका
– राज्यभरात विकास कामात सु बे अभियंते महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र त्यांच्या हक्काना प्रशासकीय यंत्रणा दाबून धरते. त्यामुळे राज्याचा एकंदरीत विचार करता, सचिवांनी बांधकाम विभागात कार्यरत प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांच्या स्वंतत्र बैठका आयोजित कराव्या, त्यांना आपल्या अधिनिस्त अभियंते आणि अधिकारी यांना नियोजनात्मक सूचना कराव्या असे आदेश देखील त्यावेळी चौहान यांनी दिले.