Home नाशिक अजमेर सौंदाणे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जनरल जागेवर आदिवासी उमेदवाराचा दणदणीत विजय,!!!

अजमेर सौंदाणे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जनरल जागेवर आदिवासी उमेदवाराचा दणदणीत विजय,!!!

133
0

आशाताई बच्छाव

IMG_20231108_173924.jpg

अजमेर सौंदाणे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जनरल जागेवर आदिवासी उमेदवाराचा दणदणीत विजय,!!!
अजमेर सौंदाणे,(जगदिश बधान)-बागलाण तालुक्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतीत दिग्गजांना जबरदस्त धक्का बसल्याचे निवडणुक निकालातुन समोर आले आहे.परंतु या सर्व पाश्र्वभूमीवर अजमेर सौंदाणे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जनरल जागेवरील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.याठिकाणी झालेल्या लढतीत विद्यमान सरपंचांच्या पॅनलकडून उमेदवार श्री गणपतसिंग जयसिंग मगर व कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले आदिवासी उमेदवार सचिनभाऊ सोनवणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली.तसेच वॉर्ड क्रमांक 2 मध्ये दुधमाळ आदिवासी वस्तीसह गावातील बहुतांश आदिवासी मतदान असल्यामुळे लढत चुरशीची झाली.तसेच गावातील धनगर,मराठा,चांभार, कोळी,सुतार,मातंग,आदिचे मतदान असल्यामुळेच तालुक्यात प्रथमच जनरल जागेवर आदिवासी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे सुरुवातीपासुनच ही पोटनिवडणुक चर्चेचा विषय झाला होता.सोमवारी आलेल्या निकालानंतर सरपंचांसह अनेक दिग्गजांना जबरदस्त धक्का बसला.तसेच तालुक्यातील अनेक मातब्बरांचे देखील धाबे दणाणले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.कारण पुढे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतदेखील असाच चमत्कार होऊ शकतो अशीदेखील चर्चा सध्या रंगु लागली आहे.बागलाण तालुक्यात आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असुन जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणातून जर जनरल जागेवर आदिवासी उमेदवारांनी दावा केला तर अनेक मातब्बरांचा भ्रमनिरास होऊ शकतो अशा चर्चांना तालुक्यात सध्या मोकळी वाट झाली आहे.
अजमेर सौंदाणे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सचिन सोनवणे यांना 381 व सरपंचांच्या पॅनलचे उमेदवार गणपतसिंग जयसिंग मगर यांना 297 मतदान मिळाले त्यात सचिन सोनवणे यांनी तब्बल 84 मतांनी पराभव करून गावाच्या इतिहासातील प्रथमच तगडा झटका देऊन इतिहास रचला आहे.म्हणून गावातील नागरिकांसह पंचक्रोशीत या विजयाची चर्चा सुरू असून सचिन सोनवणे यांच्यासह आदिवासी कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleबांधकाम मंत्र्यांनी जाणून घेतल्या इंजिनिअर असोसिएशनच्या समस्या!
Next articleअंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20%वाढ व सेवा भरतीकरिता वयामधे सूट यास मान्यता -आदिती तटकरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here