Home अमरावती स्वावलंबी भारत अभियान अंतर्गत ई.सी. ई.इंडिया फाउंडेशन व नरसम्मा महाविद्यालय अमरावती द्वारे...

स्वावलंबी भारत अभियान अंतर्गत ई.सी. ई.इंडिया फाउंडेशन व नरसम्मा महाविद्यालय अमरावती द्वारे हुतात्मा दिन संपन्न.

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20240324_181216.jpg

स्वावलंबी भारत अभियान अंतर्गत ई.सी. ई.इंडिया फाउंडेशन व नरसम्मा महाविद्यालय अमरावती द्वारे हुतात्मा दिन संपन्न.
प्रा.विशाल मोकाशे व अमित अरोकर यांची प्रमुख उपस्थिती.
———–
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती

स्थानिक अमरावती येथील नरसम्मा हिऱ्या शैक्षणिक त्रस्त द्वारे संचालित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय किरण नगर येथे स्वावलंबी भारत अभियान अंतर्गत ई .सी. ई.इंडिया फाउंडेशन द्वारे नुकतीच एक दिवसीय व्याख्यानमाला हुतात्मा दिनाचे औचित्य साधून संपन्न झाली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र चंदनपाट , प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विशाल मोकाशे, प्रमुख उपस्थिती अमित आरोकर, मराठी विभागाचे प्रमुख डॉ.वानखडे सर, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.निखिल मोहोड प्रामुख्याने उपस्थित होते. शहीदे आझम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, भारत माता यांच्या प्रतिमाना हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्रा. निखिल मोहोड यांनी केला. स्वावलंबी भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक अमित अरोकार यांनी ई. सी. ई.इंडिया फाउंडेशन व स्वावलंबी भारत अभियान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सोबतच उद्योजकता निर्माण व्हावी विद्यार्थ्यांनी व्यवसाय उद्योग या विषयावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.विशाल मोकाशे यांनी शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान विविध उदाहरणांच्या आधारे विशद करून सांगीतले,ते पुढे म्हणाले की क्रांतिकारकांच्या इतिहास आजच्या तरुणांनी अभ्यासणे आवश्यक आहे,शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांनी सामान्य जनतेला स्वातंत्र्य सूर्य पाहता यावा म्हणून आपले बलिदान दिले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन डॉ.राजेंद्र चंदनपाट यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित यादव, अजिंक्य देशपांडे, प्रा.निखिल मोहोड यांनी प्रयत्न केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Previous articleबीड जिल्हावासीयांना होळी- धुलीवंदनच्या पालकमंत्री धनंजय मुंडेकडून शुभेच्छा
Next articleअमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सेमाडोह जवळ एसटी बस दरीत कोसळली, २ मृत्यू व 25 जखमी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here