Home बीड बीड जिल्हावासीयांना होळी- धुलीवंदनच्या पालकमंत्री धनंजय मुंडेकडून शुभेच्छा

बीड जिल्हावासीयांना होळी- धुलीवंदनच्या पालकमंत्री धनंजय मुंडेकडून शुभेच्छा

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240324_180923.jpg

बीड जिल्हावासीयांना होळी- धुलीवंदनच्या पालकमंत्री धनंजय मुंडेकडून शुभेच्छा

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: २४ मार्च २०२४ रोजी होलीकेच्या पवित्र अग्नीमध्ये दुःख, दारिद्रय, आणि अहंकाराचे दहन होऊन सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदावी अशा शब्दात राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी होळी व धुलीवंदनाच्या बीड जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. होळीच्या अग्नीमध्ये वाईट प्रवृत्तीचे दहन करून धुलीवंदनाच्या दिवशी रंगाचा उत्सव साजरा करण्याची होळीची परंपरा आहे. यावर्षी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यावर नैसर्गिक जलसंकट आहे. त्यामुळे धुलीवंदन – रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच इजा करणारे रंग टाळून नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे सर्व जनतेस आव्हान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here