Home बीड बीडमध्ये खळबळजनक घटना अल्पवयीन मुलीची हत्या; मुख्य आरोपीने विषारी द्रव प्राशन करून...

बीडमध्ये खळबळजनक घटना अल्पवयीन मुलीची हत्या; मुख्य आरोपीने विषारी द्रव प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न

37
0

आशाताई बच्छाव

IMG_20240324_180544.jpg

बीडमध्ये खळबळजनक घटना अल्पवयीन मुलीची हत्या; मुख्य आरोपीने विषारी द्रव प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: २४ मार्च २०२४ बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घोसापुरी येथे नात्यातील आरोपींनी अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेने बीड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एकूण ०५ आरोपींचा समावेश असून यातील ०३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मुख्य आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी बन्सी माळी (वय १७ वर्षे ) रा. घोसापुरी ता. जि. बीड असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. मयत ही आरोपीच्या मामाची मुलगी असून नात्याने मामेभाऊ लागत असलेल्या आरोपींनी इतर चार जणांना सोबत घेऊन माझ्यासोबत लग्न का करत नाही? म्हणून होळी या आनंदाच्या सणाच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरा हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. व तात्काळ तपासाची चक्रे फिरवून ०३ आरोपींना ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने जनतेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आरोपीने अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात असून तो तपासात निष्पन्न होईल असे पोलिसांनी आश्वासन दिले असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

Previous articleस्त्रियांचे अस्तित्व
Next articleबीड जिल्हावासीयांना होळी- धुलीवंदनच्या पालकमंत्री धनंजय मुंडेकडून शुभेच्छा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here