Home Breaking News आजची मेजवानी (शुक्रवार २० जानेवारी)

आजची मेजवानी (शुक्रवार २० जानेवारी)

134

आशाताई बच्छाव

IMG-20230120-WA0021.jpg

आजची मेजवानी
(शुक्रवार २० जानेवारी)

तिळगुळ डिंक वडी

(युवा मराठा न्युज नेटवर्क)

साहित्य
1. 1 वाटी तीळ भाजून त्याचे भरड कूट
2. 1/2 वाटी शेंगदाणे भाजून साले काढून त्याचे कूट
3. 1/4 वाटी डिंक तुपात तळून
4. 1/2 चमचा सुंठ पावडर
5. 2 चमचे दुध
6. 3-4 चमचे तूप
7. 1 वाटी गूळ चिरलेला
कुकिंग सूचना
गरम कढई मध्ये 2चमचे तूप घालून ते विरघळले की गूळ घालायचा व त्यात 2चमचे दुध घालायचे.गूळ सतत हलवत राहायचा, गूळ पूर्ण विरघळाला की, थोडे बुडबुडे येऊ लागतात. गॅस बंद करायचा.त्यामध्ये तीळकुट, शेंगदाणा कूट, सुंठ, तळलेला डिंक थोडा चुरून सर्व मिक्स करायचे. हलवत राहायचे मिश्रण कढई पासून थोडे वेगळे होऊ लागते तेंव्हा, तूप लावलेल्या ताटात ओतायचे व तूप लावलेल्या वाटीने एकसारखे करून वरती खोबऱ्याचा खिस घालून पुन्हा एकदा वाटी फिरवायची व वड्या कट करायच्या. गार झाल्यावर सुट्ट्या करून डब्यात भरून ठेवायच्या. मिश्रण जर पातळ वाटले तर अजून 2मि गॅस वर ठेवायचे व मिश्रण जर खुप पुढे गेले वाटले तर थोडे 1चमचा दुध घालून गॅस वर अगदी थोडा वेळ ठेऊन मऊ झाल्यावर वड्या साठी ताटात घालावे.

Previous articleभाजप राज्य कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये होणार!!
Next articleनाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.