Home नाशिक भाजप राज्य कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये होणार!!

भाजप राज्य कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये होणार!!

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20230119-WA0049.jpg

भाजप राज्य कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये होणार!!

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

नाशिक : १० आणि ११ फेब्रुवारीला होणारी भाजप कार्यकारिणी बैठकीसाठी नाशिक हे लोकेशन असणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे असेल. १० आणि ११ फेब्रुवारीला भाजपच्या कार्यकारणीची नाशिकमध्ये बैठक पार पडेल, सर्व केंद्रीय मंत्री आणि पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित असतील अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
भाजपची ही महत्वाची बैठक १० आणि ११ फेब्रुवारीला नाशिक मध्ये होईल. या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्री आणि पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित असतील. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यासोबतच इतर महत्वाच्या मुद्द्यांवर काय चर्चा होतात याकडे नाशिकसह राज्याचे लक्ष लागून असणार आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वपूर्ण अशी ही बैठक मानली जात आहे.
आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा तसेच पक्षाची रणनीती बद्दल चर्चा या बैठकीत होईल त्यामुळे नाशिक मध्ये होणात्री हि बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे

चंद्रकांत बावनकुळे यांची माहिती…
नाशिकमध्ये राज्य कार्यकारिणी बैठक होणार असल्याची माहिती दिल्यानंतर चंद्रशेख! बावनकुळे यांनी मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून होत असलेल्या टीकांना उत्तर दिले एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई यावरून राजकारण रंगत आहे. मोठ्या प्रमाणात होर्डिंग बाजी पाहायला मिळत आहे. रंगरंगोटी झाली आहे आणि यावरून टीका झाली आहे यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमधील दौरा म्हणजे प्लान डेव्हलपमेंट आहे आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरला मोठं करण्यासाठी काम करण्यात आलं त्याच रस्त्याचे डांबरीकरण, त्याच रस्त्याची वारंवार दुरुनी असा कारभार होता मात्र आज शंभर वर्ष रस्त्याता रस्त्याला काही होणार नाही असे प्लान डेव्हलपमेंट करण्याकरता मुखामंत्री एकनाथ शिदे यांनी योजना केली आहे आणि त्याचं उद्घाटन होणार आहे
यावेळी चंद्रशेखर बावनकुळ यांनी विरोधी पक्षाला देखील सुनावले ‘मुंबईमध्ये जलनिस्सारण निस्सारण आतापर्यंत रखडलेले होते. ते काम लवकरच पूर्ण होईल मेट्रो प्रकल्पाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झाले होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई शहरात प्लान डेव्हलपमेंट केले अनेक प्रकल्प दिले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा पेनच चालत नव्हता त्यामुळे त्यांनी कधी प्लान डेव्हलपमेंटचा विचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आज मुंबईला देणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं डेव्हलपमेंट आहे महाराष्ट्रातून मुंबईकरांकडून याचे स्वागत है त आहे. दरम्यान एखादा विकार मागण्याची अपेक्षा विरोधी पक्षाकडून होती. विरोधकांनी विरोध करू नये तर महाराष्ट्राच्या विकासासाठी काही प्रकल्पांची मागणी करावी, अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Previous articleआज मुक्रमाबाद येथे विरभद्रेश्वरांचा विवाह सोहळा
Next articleआजची मेजवानी (शुक्रवार २० जानेवारी)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here