Home बुलढाणा पाऊस नावाला, दामिनीचे मात्र थैमान ! वीज पडून एकाचा मृत्यू ; एक...

पाऊस नावाला, दामिनीचे मात्र थैमान ! वीज पडून एकाचा मृत्यू ; एक गंभीर …!

141

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0004.jpg

पाऊस नावाला, दामिनीचे मात्र थैमान ! वीज पडून एकाचा मृत्यू ; एक गंभीर …!

ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा:-
जिल्ह्यात अजूनही दमदार व पेरणीयोग्य पाऊस झाला नसला तरी विजेचे थैमान कायम आहे. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांत विजेने एकाचा बळी घेतला तर एक इसम गंभीर जखमी झाला.

बुलडाणा नजीकच्या कोलवड येथे काल, रविवारी( दि १९) दुपारी अडीच वाजताच्या आसपास अंगावर वीज कोसळून एक जण गंभीर जखमी झाला. राजेश शेषराव जाधव असे त्याचे नाव असून ते शेतात काम करीत असताना विजेचा लोळ अंगावर कोसळला. जखमी जाधवला बुलडाण्याच्या एका खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. अन्य घटनेत जळगाव तालुक्यातील आडोळ बुद्रुक येथील पंजाब उत्तम उगले( ५५)यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

Previous articleNational News प्रेमात धोका! दोघांनी सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला! प्रेयसीने नदीत उडी मारली अन् प्रियकर उडी न मारताच पळाला!
Next articleयुवक काँग्रेसने मशाल मोर्चा काढून केला केंद्र सरकारचा निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.