• Home
  • National News प्रेमात धोका! दोघांनी सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला! प्रेयसीने नदीत उडी मारली अन् प्रियकर उडी न मारताच पळाला!

National News प्रेमात धोका! दोघांनी सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला! प्रेयसीने नदीत उडी मारली अन् प्रियकर उडी न मारताच पळाला!

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0003.jpg

National News प्रेमात धोका! दोघांनी सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला! प्रेयसीने नदीत उडी मारली अन् प्रियकर उडी न मारताच पळाला!

लखनौ(युवा मराठा न्युज ग्रुप नेटवर्क): साथ जियेंगे और साथ मरेंगे अशी शपथ दोघांनी घेतली. एकमेकांशी भांडण झाल्याने प्रेमीयुुगलाने सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जोडपे नदीच्या काठावर पोहचले. दोघांनी एकमेकांना कडाडून मिठी मारून आता पुढच्या जन्मातच भेटू असे म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. प्रेयसीने नदीत उडी मारली मात्र तेवढ्यात प्रियकर उडी न मारता पळून गेला. प्रेयसीला पोहता येत असल्याने ती पोहत पोहत बाहेर आली अन् तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत प्रियकराने धोका दिल्याची तक्रार दिली.

उत्तरप्रदेशातील प्रयागराज मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. जोडप्याची विचित्र लव्हस्टोरी ऐकून पोलिसही क्षणभर चक्रावून गेले. या प्रकरणातील प्रेयसी ही ३२ वर्षांची विवाहित असून तिचा प्रियकर तिच्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे. वयाने मोठ्या असलेल्या नवऱ्याशी पटत नसल्याने तिचे तरुणासोबत सुत जुळले होते. गेल्या तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. सोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या होत्या.

anews Banner

Leave A Comment