Home Breaking News 🛑 चिंचपोकळीचा चिंतामणी यावर्षी मुर्ती घडवणार नाही, पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना...

🛑 चिंचपोकळीचा चिंतामणी यावर्षी मुर्ती घडवणार नाही, पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

86
0

🛑 चिंचपोकळीचा चिंतामणी यावर्षी मुर्ती घडवणार नाही, पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 4 जुलै : ⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागपाठोपाठ आता गिरणगावातला चिंचपोकळीचा चिंतामणी मूर्ती घडवणार नसून पारंपारिक चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करणार असल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्व सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांना दिल्यानंतर प्रत्येकाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेतले आहेत. यामध्ये गिरणगावातला चिंचपोकळीचा चिंतामणी मूर्ती घडवणार नसून पारंपारिक चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करणार असल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने प्रसिद्ध असलेला चिंतामणीचा आगमन सोहळा,पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचे आधीच जाहीर केलेले आहे. मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने आधीच जाहीर केलेले होते.

चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गतवर्षी शतक महोत्सव जल्लोषात, आनंदात व भक्तिभावाने साजरा केला. यंदाचे मंडळाचे 101 वे वर्ष असून मंडळाने गत 100 वर्षात सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेच काम करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मूर्तीची उंचीबाबत बोलताना मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्वाची असे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद देताना, सद्य परिस्थितीत धार्मिक बाब, चिंतामणी भक्त, शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा, जनतेचं आरोग्य या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून मंडळाच्या आदर्शवादी भूमिकेची जाण ठेवून मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मंडळात पुजल्या जाणार्‍या पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी दिली आहे.

त्याचबरोबर मंडळाने हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून जाहीर करतांना गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर,आरोग्य चिकित्सा, रुग्णसाहित्य केंद, शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरण आणि 101 कोविड योद्धयांचा सन्मान आदी विविध आरोग्यविषयक उपकरण राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी दिली आहे. मंडळ या वर्षी मंडपासमोर कृत्रिम तलाव बांधून तेथे विभागातील घरगुती गणेश मूर्तीना विसर्जनासाठी उपलब्ध करून देणार आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा या वाक्यानुसार मंडळ यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करून जनतेचे आरोग्य जपण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.⭕

Previous articleAmazon नोकर भरती जाहिरातीत मराठी भाषेचा समावेश नाही; मनसे आक्रमक 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next article*भाजप प्रदेश कार्यकारिणीची काल घोषणा:**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here