**भाजप प्रदेश कार्यकारिणीची काल घोषणा:**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी काल प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. काल जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये 12 प्रदेश उपाध्यक्ष, 6 प्रदेश सरचिटणीस व 12 चिटणीस यांचा समावेश आहे. त्या शिवाय सात मोर्चा आणि 18 विविध प्रकोष्ठाची नियुक्तीही काल जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणीत तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र व सामाजिक विभाग लक्षात घेऊन सर्व विभागाना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.
त्य़ाचबरोबर या पदाधिकारी कार्यकारिणीत 33 टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश आहे.
प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते व प्रसिध्दी माध्यम प्रमुख यांचीही नियुक्ती करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांसोबतच युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा यांच्या प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्याशिवाय कोषाध्यक्ष, कार्यालयप्रभारी, सहकार्यालयप्रभारी, प्रदेश कार्यालयमंत्री व सहकार्यालमंत्री यांचीही काल घोषणा करण्यात आली.
•खासदार रक्षा खडसे यांना प्रदेश मंत्री म्हणून नियुक्ती दिली आहे.
•माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.
‘ याशिवाय सुजितसिंह ठाकूर, रवींद्र चव्हाण, देवयानी फरांदे, श्रीकांत भारतीय या पाच जणांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
•पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांना बढती मिळाली.
• माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल आणि संजय कुटे, सुरेश हळवणकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, जयप्रकाश ठाकूर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
•विश्वास पाठक मीडिया प्रमुख म्हणून काम पाहतील. विजय पुराणिक हे संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी पुढेही सांभाळतील. मिहिर कोटेचा यांना खजिनदारपद देण्यात आले आहे.