Home नाशिक श्री क्षेत्र कोटमगाव येथे २१ रोजी श्री गुरुदेव दत्त महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा...

श्री क्षेत्र कोटमगाव येथे २१ रोजी श्री गुरुदेव दत्त महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने त्रिदिनी कार्यक्रमांचे आयोजन

22
0

आशाताई बच्छाव

1000302581.jpg

श्री क्षेत्र कोटमगाव येथे २१ रोजी श्री गुरुदेव दत्त महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने त्रिदिनी कार्यक्रमांचे आयोजन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

श्रीक्षेत्र कोटमगाव तालुका निफाड येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नासिक सह जिल्हाध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज शिरसाठ यांच्या संकल्पनेतून व वै परमपूज्य नानाजी महाराज वडनेरे ,वै ह भ प भागवत बाबा शिंदे खडक माळेगाव, वै ह भ प भाऊराव अण्णा शिरसाट कोटमगाव यांच्या कृपाशीर्वादाने शुक्रवार १९ एप्रिल ते २१ एप्रिल या रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे‌.
कार्यक्रम रुपरेषा प्रमाणे शुक्रवार १९ व शनिवार २० रोजी सकाळी ७ वाजता दत्त महाराज मूर्ती मिरवणूक, 8 ते 11 होम हवन व नंतर 3 ते 6 होम हवन व रात्री ८ वाजता हरिपाठ, रात्री ८ ते ९ श्री धर्माचार्य ह भ प निवृत्ती महाराज रायते नाशिक जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे प्रवचन होईल व त्यानंतर ९ ते ११ भजनाचा कार्यक्रम होईल व रविवार २१ रोजी सकाळी सहा ते दहा होम हवन व नंतर मूर्ती पूजा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज व विमलगिरी महाराज यांच्या हस्ते व साधुसंतांच्या उपस्थितीत होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक
ह भ प बाळासाहेब महाराज शिरसाट सह जिल्हा अध्यक्ष. भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा यांनी दिली आहे.

Previous articleसंवेदना जागृत करायचं दायित्व आणि कर्तव्य साहित्यकारांचेच—– प्रा.वा. ना.आंधळे
Next articleडॉ.रवींद्र भोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राइड आयकॉन अवॉर्ड प्रदान —
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here