Home नाशिक संवेदना जागृत करायचं दायित्व आणि कर्तव्य साहित्यकारांचेच—– प्रा.वा. ना.आंधळे

संवेदना जागृत करायचं दायित्व आणि कर्तव्य साहित्यकारांचेच—– प्रा.वा. ना.आंधळे

25
0

आशाताई बच्छाव

1000302572.jpg

संवेदना जागृत करायचं दायित्व आणि कर्तव्य साहित्यकारांचेच—– प्रा.वा. ना.आंधळे

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

दिवसेंदिवस वाढत जाणारी धावपळ व अतिव्यस्तता यामुळे मानवी संवेदना तीव्र गतीने नष्ट होत आहेत.ही सामाजिक व सांस्कृतिक हानी असून ती हानी थांबवण्याचे दायित्व आणि कर्तव्य हे साहित्यकारांचे आहे.साहित्यानं आजवर वेळोवेळी समाजमनाचे व समाजभानाचे मूल्यसंवर्धन केले असून संत साहित्यापासून तर आधुनिक साहित्यापर्यंत त्याचे सम्यक दर्शन घडते.आजच्या नव्या पिढीचे वाचन अल्पस्वल्प झाल्याची खन्तही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली.मध्यप्रदेशातील इंदूर येथे मराठी भाषा संरक्षण समिती व पद्मभूषण तात्यासाहेब सरवटे व राजकवी झोकरकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ प्रीतमलाल दुआ सभागृहात दि.१३ व १४ एप्रिल २०२४ रोजी आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनात कवी प्रा.वा. ना.आंधळे आंधळे हे कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.सत्तर मिनिटांच्या आपल्या भाषणातून कवितेचे सामर्थ्य आणि कवितेच्या विविधांगी प्रवाहाचे दर्शन श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद देत स्वीकारले.श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव पंचेचाळीस भाषेत अनुवादित झालेली प्रा.आंधळे यांची *आई ! मला जन्म घेऊ दे* ही स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात सर्वश्रुत असलेल्या कवितेचे सादरीकरण करीत श्रोत्यांना भावुक केले.
नियोजित कवी संमेलनात मध्यप्रदेशातील पंचवीस कवी कवयित्रींनी काव्यवाचन करीत सभागृहास मंत्रमुग्ध केले.यशस्वी रंजन व प्रबोधन करण्यात कवी श्रीकांत तारे,सुजाता देशपांडे,माधवी करमळकर,सुषमा ठाकूर,कल्पना चौधरी,कविता पुणतांबेकर,ज्योती निकम,यशवन्त गोरे,मदन बावडे, संजीव दिघे,आशुतोष देशपांडे यांच्या सुश्राव्य काव्यवाचनाने चांगलीच सरशी केली.सूत्र संचलन कवी श्रीकांत तारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संमेलनाचे प्रमुख आयोजक साहित्यिक तथा पत्रकार श्री.अनिलकुमार धडवाईवाले यांनी केले.

Previous articleकाही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात
Next articleश्री क्षेत्र कोटमगाव येथे २१ रोजी श्री गुरुदेव दत्त महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने त्रिदिनी कार्यक्रमांचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here