Home जालना भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जिल्हाप्रमुख सुभाष दांडेकर...

भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जिल्हाप्रमुख सुभाष दांडेकर यांच्याकडून निषेध

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0053.jpg

भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावरील
भ्याड हल्ल्याचा जिल्हाप्रमुख सुभाष दांडेकर यांच्याकडून निषेध
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चंद्रशेखर यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी, एक गोळी त्यांच्या शरीराला स्पर्श करुन गेली. चालत्या वाहनावर रॅपिड गोळीबार करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा भीम आर्मीचे जालना जिल्हा प्रमुख सुभाष दांडेकर यांनी निषेध केला आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात दांडेकर म्हणाले की, सहारनपूर जिल्ह्यातील देवबंदमध्ये भीम आर्मीचे संस्थापक आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. एक गोळी चंद्रशेखर यांच्या शरीराला स्पर्श करुन गेली. चंद्रशेखर हे देवबंदला 1 केव्हीमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. त्याच वेळी एका गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याचा आपण जालना जिल्हा भिम आर्मीच्या वतीने निषेध करत आहोत. तसेच हल्लेखोरांना  तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दि. 30 रोजी निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.

Previous articleराजकीय श्रेयवादात रखडून पडलेल्या जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास अखेर राज्य शासनाची मान्यता
Next articleसाध्वींचा मंगलमय आणि नयनरम्य प्रवेश सोहळ्याने उपस्थित दंग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here