आशाताई बच्छाव
!साध्वींचा मंगलमय आणि नयनरम्य प्रवेश सोहळ्याने उपस्थित दंग
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चातुर्मास-2023 चे आयोजन केले असून त्यानिमित्ताने स्वाधींचा मंगलमय आणि नयनरम्य प्रवेश सोहळ्याने जैन धर्मियांसह उपस्थित दंग राहिले. शिवाजी पुतळ्यानजीक असलेल्या पावन तपोधाममधील गुरु गणेश सभा मंडपात चातुर्मासाचे प्रवचन चार महिने श्रवण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. श्रमण संघीय आचार्य प. पू. डॉ. शिवमुनीजी म सा. या शुभ आशिर्वादाने शासन प्रभाविका आयंबील तप आराधिका महासती डॉ. श्री. पुनीतज्योती म. सा; तपसुर्या महामती निधीज्योतीश्रीजी म. सा. प्रवचन सम्राज्ञी डॉ. मुक्ताश्रीजी म. सा. तपचंद्रीका साध्वी विपुलजी म. सा; तपज्योत्सना स्वाधी मोक्षाजी म. सा; तपज्योत्सना सेवाभावी साध्वी वत्सलजी म. सा; साध्वी गौतमीजी म. सा; आणि साध्वी अर्हताजी म. सा. यांच्या सानिध्यात हा चातुर्मास होत आहे.
यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत साध्वींसह समाजातील पुरुष, महिला, युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ही शोभा यात्रा सकलेचानगर, बस स्थानक, मामा चौक, सुभाष रोड, टांगा स्टॅण्ड मार्गे गणेशनगरात विसर्जीत करण्यात आली. समाज बांधवांनी दैनंदिन प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुदेशकुमार सकलेचा आणि महामंत्री डॉ. धरमचंद गादिया तसेच विश्वस्त मंडळाने केले आहे.






