आशाताई बच्छाव
फरशीवरून पाय घसरल्याने 16 वर्षीय युवतीचा मृत्यू
प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज
नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील सारताळे येथे बुधवारी सकाळी फरशी वरून घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सारताळे येथील सिद्धी भैय्यासाहेब बोरसे वय वर्ष 16 हीबुधवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंड धुण्यासाठी जात असताना फरशीवरून पाय घसरून पडल्याने डोक्याला जबर मार लागला तिच्या आई-वडिलांनी गावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.






