Home नाशिक बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी

72
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230629-214042_WhatsApp.jpg

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी

प्रतिनिधी . प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज

देवळा तालुक्यातील वाखारी येथे (उंबर ओहोळ शिवार) येथील श्री. बाजीराव भागोजी जाधव यांचे मालकी गट नंबर १३३० मध्ये ‌(दि२८) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास श्री. नानाजी दादाजी पवार (वय वर्ष ५२) व श्री लक्ष्मण बाजीराव जाधव (वय वर्षे ४०) या दोन व्यक्तींवर बिबट्या वन्य प्राण्यांने हल्ला करत जखमी केले आहे. जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देवळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यापैकी श्री. जाधव यांच्या कपाळावर व गालावर खोल जखम झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. व श्री पवार यांना हातावर व पाठीवर किरकोळ जखम असल्याने त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र देवळा येथे उपचार करून घरी सोडण्यात आले. वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराचि पहानी केली. व अदिसूचना वन विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा व ट्रॅककॅमेरा लावण्यात येणार आहे.

Previous articleफरशीवरून पाय घसरल्याने 16 वर्षीय युवतीचा मृत्यू
Next articleआषाढी एकादशी निमित्त विशेष लेख
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here