Home सांस्कृतिक आषाढी एकादशी निमित्त विशेष लेख

आषाढी एकादशी निमित्त विशेष लेख

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20230629-WA0074.jpg

आषाढी एकादशी निमित्त विशेष लेख

मुख दर्शन व्हावे आता ..
तु सकळ जनांचा दाता..
घे कुशीत या माऊली..
तुझ्या चरणी ठेवितो माथा..
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.”

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी—

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

वारकऱ्यांचं आराध्य दैवत अखिल गुण निदान, करुणा वरूणालय, भक्तवत्सल विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेली होती आणि अचानक दूरच्या नात्यातील आजी भेटल्या गप्पा करताना त्यांनी पटकन विचारलं का गं माहेरी कोण असतं! कुठे आहे माहेर तुझे आणि आपोआप नजर खाली गेली शेणाने सारवलेल्या जमिनीवर मी उगाचच पायाच्या नखाने उकरत राहिले आणि नकळत गालावर अश्रू ओघळले माझे माहेर कुठे ?आता तिथे कोणी नाही मन उदास उदास झाले आणि अचानक मुखातून निघणाऱ्या अभंगाने उदास मनावर मात केली ज्याशी नाही पंख पाय त्यांने करावे ते काय शुद्ध भाव देखोनिया पंढरपुरासी जाय …आणि पटकन म्हटला आहे ना माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्यातीरी आणि साक्षात राउळातील तो पांडुरंग माझ्याकडे बघून स्मित करत असल्याचा भास झाला का असावी ही ओढ अगतिकता कारण विठ्ठल दर्शनाची आस मनाला लागली कारण पंढरीची वारी जवळ येऊ लागली जाता पंढरीसी सुख वाटे जीवा… वारी एक अमृत अनुभव ! पंढरीच्या वारीची ओढ प्रत्येक मनाला असतेच युगा नु युगे विटेवर उभ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी पंढरीला जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्यात वारकरी होण्यात एक आगळा आनंद दडलेला आहे प्रत्येक वळणावर नवीन गाव, नवी माणसे मात्र भाव तोच वारीत समरस होणे फक्त नाम रंगी रंगण्याचे पुढील पायवाट चालायची त्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी भेटी लागी जिवा लागलिसी आस… वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे गेले सातशे आठशे वर्षांपासून वारीचा हा अमोघ प्रवास अविरतपणे वाहतो आहे चैतन्य ऊर्जा उत्साह आनंद आणि भक्ती याचा महासमन्वय म्हणजे वारी साधारण आषाढ महिना सुरू झाला की मनाला ओढ विठ्ठल दर्शनाची माहेर पंढरी गाठण्याची शेतकऱ्यांनी शेताची मशागत करून बी पेरलेले असते त्या बी ला जसे रुजण्यासाठी हवा पाणी मायेच्या उबेची निगराणी हवी तसेच मानवी जीवन जगताना निस्वार्थी निरपेक्ष भावना माणूसपणाची जाण यासाठी वारी प्रत्येकाने करावी. भक्ती, शक्ती ,युक्ती आणि मुक्ती या चतुरुंगी घटकांचा अनुभव म्हणजे वारी लहानांपासून थोरांपर्यंत मानवी जीवनाचा दिशादर्शक म्हणजे वारी इथे अहंपणाचा निचरा होतो‌. फक्त पांडुरंग चरणाची विलीनता असते या जगात मी माझे म्हणणारे खूप सारे भेटतात पण जगी ज्याशी कोणी नाही त्यास देव आहे हा ठाम विश्वास म्हणजे वारी भक्तीरसात नाहून नामात रंगून माझे माहेर पंढरी म्हणत माहेरपणाला जाणारा वारकरी हा स्वयंशिस्तीचे प्रतीक वारीत देह मन आणि बुद्धीचे विकार दूर दोष दूर होतात निसर्गाशी नाळ जुळते नियोजन संघटन संवाद व्यवस्थापन असे महत्त्वाचे घटक इथे कृतीशीलपणे अमलात येतात गायन कीर्तन वादन नर्तन यासह रिंगण असे अनेक सुप्त होणारे खेळ व पारंपारिक संस्कृतीचे संवर्धन केले जाते वारीत भेदाभेद अमंगळ सर्वजण समसमान प्रत्येकाची इच्छा मानस एकच फक्त सावळ्या तुझे रूप बघू देत याची देही याची डोळा चरणी लीन होऊ दे आम्ही पामर दोष काम क्रोध नि भरलेले आहोत एक क्षण तुझ्या चरणी विसावा घेतला तुझे रूप बघून आमचे दोष निवारण्यासाठी मानवतेची तू शिकवण देतो वारी ही आमच्यासाठी आनंद यात्रा आहे वारी अनुभवली नाही असे म्हणणारा करंटाच रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी अशा महान संतांच्या शब्दाने पालखी खांद्यावर घेत ही वारी प्रवाहित होते विठ्ठल नामी रंगण्यासाठी अख्या जगाचा तो मायबाप अनेकांचे माहेर श्रद्धास्थान खरंतर दरवर्षी जणू वारीच्या निम्मित्याने तो प्रत्येकाला माहेरपणाला बोलावत असतो आनंद विसाव्यासाठी कोड कौतुकात रंगण्यासाठी आणि माझ्या ही मनाला त्या सावळ्याच्या भेटीचे त्याच्या चरणाचे वेध लागतात. मुखी अभंग रंगतो माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी डोळ्याचे पारणे फेडणारा चैतन्यदायी पालखी सोहळा अनुभव म्हणजेच वारी एक अमृत अनुभव अमृतानुभव.

सौ स्मिता शेखर कुलकर्णी—विश्वस्त ब्राह्मण महासंघ

Previous articleबिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी
Next articleमालेगांव पंचायत समितीपुढे व-हाणे प्रकरणात आता पुन्हा ११ जुलैपासून एल्गार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here