Home संपादकीय सुवर्णा सांळुखेचा अनोखा कारनामा भाग – ३

सुवर्णा सांळुखेचा अनोखा कारनामा भाग – ३

155
0

राजेंद्र पाटील राऊत

20230831_201141-BlendCollage.jpg

संपादकीय अग्रलेख….
सुवर्णा सांळुखेचा अनोखा कारनामा भाग – ३
वाचकहो,
कुठल्याही गोष्टीचा ताळमेळ सोडला की,माणूस बेतालपणे वागू लागतो.”मेरी सुनो” करण्याच्या नादात.मीच किती खरा सत्यवान!बाकी सगळे आपल्या नजरेत लबाड व कवडीमोल असे जेव्हा समोरचा व्यक्ती समजायला लागतो,तेव्हा समजून जायचे की,एक तर “मेरी सुनो” करणारी व्यक्ती हट्टी व अहंकारी किंवा “सायको” आहे.शासन,प्रशासन,कायदा कानून माझ्या समोर काहीच नाही,मी सांगितले तेच खरे! व मी करत आले तेच सत्य अशा अर्विभावात जेव्हा ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे खोटयाचे खरे व खोटयाचे खरे करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो त्यांचा प्रयत्न व प्रकार बुमरँग ठरुन उलट त्यांच्याच अंगलट कसा येतो याची जाण प्रशासनाला देखील आहे,मात्र ज्या व-हाणे गावात सुवर्णा सांळुखेंनी आपली अकर्तबगारीची कारकिर्द गाजविली तेथील अनोखे कागदोपत्री लबाडीचे कारनामे प्रशासनाला समजूनही,प्रशासन देखील “येडीचे मत अन घुबडाचे चाळे” करण्यातच धन्यता मानत आहे.पण…सुवर्णा सांळुखेंच्या खोटेपणाला खरे व सत्य ठरविण्यासाठी प्रशासनातल्या बडया अधिकाऱ्यांसह सगळ्यांचाच खटाटोप व आटापिटा चाललेला आहे.मात्र त्यात त्यांना यश येत नाही हि शोकांतिका म्हणावी लागेल.कारण आपण जसे कृत्य व कारनामे करु तेच अखेर प्रदर्शित होणार आहेत.सुवर्णा सांळुखेंचा व-हाणेतील कामकाजाचा इतिहास अक्षरशः सुवर्ण अक्षरात लिहला तरी अपूराच पडेल.व-हाणे गावात आदिवासी भिल्ल समाजाची मिनाबाई अभिमन सोनवणे हि महिला वास्तव्यास असताना सुवर्णा सांळुखेंने या महिलेस ग्रामपंचायत हद्दीतील शासनाची जागा बहाल केली व रितसर उतारा बनवून देण्याबरोबरच त्या जागेची करपट्टी देखील वसुल केली.पण…नंतरच्या काळात सुवर्णा सांळुखेनी घुमजाव करत कलाटणी मारली की,मिनाबाई सोनवणे यांना जागा दिलेलीच नाही,त्यांनी तो जागेचा उतारा वरवर बनवून घेतला आहे.सुवर्णा सांळुखेचा हा “मी नाही त्यातली” हा बचावात्मक कार्यक्रम बघितला तरी,एक वेळेस मिनाबाई सोनवणे हि आदिवासी महिला बनावट जागेचा उतारा बनवू शकत नाही.अन समजा बनवलाच होता तर त्यांच्यावर ग्रामपंचायतीने खोटा जागेचा उतारा बनवला म्हणून गुन्हा का दाखल केला नाही? मात्र प्रत्यक्षात सुवर्णा सांळुखेंनी लबाडीचे कामे करायचीत अन नंतर आकांडतांडव करुन सांगायचे “माझा काय दोष, मी काय चुक केली?” खरे तर मिनाबाई सोनवणे यांनी जर जागेचा बनावट व वरवर उतारा बनवला आहे,तर सन २०१६ मध्ये व-हाणे ग्रामपंचायतीच्या मालमता रजिस्टरला मिनाबाईचे लागलेले नाव सुध्दा खोटेच आहे का? याचाही खुलासा जाहीरपणे सांळुखें मँडमानी करावा एव्हढेच यानिमिताने!

Previous articleसुवर्णा सांळुखेंचा अनोखा कारनामा भाग -२
Next articleमालेगांव तालुक्यात सरपंच संघटनेचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा-अध्यक्ष भोसले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here