Home नांदेड कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचा नांदेड येथील कार्यकाळ समाप्त.नागपूर येथे बदली

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचा नांदेड येथील कार्यकाळ समाप्त.नागपूर येथे बदली

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0092.jpg

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचा नांदेड येथील कार्यकाळ समाप्त.नागपूर येथे बदली

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड दि 18 : नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची बदली नागपूर येथे झाली असून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नागपूर या पदावर करण्यात आल्याचे आदेश आज दि. 18 ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांनी काढले आहेत.

नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीम. विमला आर. यांच्या जागी डॉ. विपीन इटनकर यांची बदली करण्यात आली आहे. सध्याचा कार्यभार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले आहेत. विपीन इटणकर यांनी 17 फेब्रुवारी 2020 रोजी नांदेड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. गुरुवारी 18 ऑगस्ट 2022 रोजी त्यांची नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांनी कोरोणा काळात योग्य नियोजन आखून नांदेड जिह्यात अनेक चांगली कामे केली आहेत. कोरोना काळामध्ये आणि नंतर नांदेडच्या पूर परिस्थितीमध्ये योग्य नियोजन आखून जिल्ह्याला अनेक संकटांतून बाहेर काढल आहे. त्यामुळे नांदेडकरांच्या वतीने व विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील युवा पिढीच्या वतीने त्यांच्यावर विशेष कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तर एक तरुण तडफदार युवा प्रशासकीय अधिकारी गमावतोय याचं दुःख देखील व्यक्त होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here