Home नांदेड नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर क्रुझर गाडीचे टायर फुटून झालेल्या भिषण अपघातात...

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर क्रुझर गाडीचे टायर फुटून झालेल्या भिषण अपघातात दोन ठार तर दहा जण गंभीर जखमी

152

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0098.jpg

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर क्रुझर गाडीचे टायर फुटून झालेल्या भिषण अपघातात दोन ठार तर दहा जण गंभीर जखमी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड हैद्राबाद राज्य महामार्गावर कुष्णूर येथे क्रुझर गाडीचे टायर फुटून झालेल्या भिषण अपघातात दोन ठार तर दहा जन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असून गंभीर जखमीनां पुढील उपचारासाठी नायगाव ग्रामीण रूग्णालयात व नांदेड येथे पाठवण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देगलूर तालुक्यातील देगाव येथून नांदेडकडे नातेवाईकाच्या अंत्यविधिसाठी जात असताना नायगाव तालुक्यातील कुंटूंर पोलिस ठाणे हद्दीतील कुष्णूर येथील बाबा रामदेव धाब्याजवळ नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरून नांदेडकडे जाणा-या क्रूझर गाडी क्रं- के ए ३२ एम ६४२३ चे टायर फुटल्याने या अपघातात आमदबी खुलबोदीन शेख वय ५० वर्षे रा.देगाव ता.देगलूर व महेबुब बाबु शेख वय ४५ वर्षे रा. गोनेगाव ( मुखेड) यां दोघांचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी नायगाव ग्रामीण रूग्णालयात व नांदेड येथे पाठवण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात आले. घटनास्थळी बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक आर्चित चांडक,सपोनि महादेव पुरी यांनी भेट दिली आहे.

Previous articleनांदगांव तालुक्यातील तांदुऴवाडी शिवारात अज्ञात तरुणाचा खुन               
Next articleकर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचा नांदेड येथील कार्यकाळ समाप्त.नागपूर येथे बदली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.