Home Breaking News 🛑 मराठी न बोलणाऱ्या सराफाला मनसे दणका 🛑

🛑 मराठी न बोलणाऱ्या सराफाला मनसे दणका 🛑

111
0

🛑 मराठी न बोलणाऱ्या सराफाला मनसे दणका 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा)

मुंबई :⭕मराठी न बोलणाऱ्या आणि आपले दुकानाचे अधिकृत लायसन्स न दाखवल्यामुळे गुजराती व्यापाऱ्याला मनसेने दणका दिला आहे.

काल सोशल मिडीयावर लेखिका शोभा देशपांडे यांनी केलेल्या आंदोलनाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेत सराफ दुकानाच्या मालकास बोलावून माफी मागण्यास भाग पाडले. मराठीजनांचा आग्रहापुढे अखेर गुजराती सराफ दुकानदाराने मराठीतून माफी मागत आपली चूक कबुल केली.

लेखिका शोभा देशपांडे या कुलाबा परिसरात असणाऱ्या महावीर ज्वेलर्स येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दुकानदाराला मराठीत बोलण्याचा आग्रह धरला.

यावेळी दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देत शोभा देशपांडे यांचा अपमान केला. गुरुवारी सायंकाळ ५ वाजल्यापासून शोभा देशपांडेंनी दुकानासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले होते.

शोभा देशपांडेनी आपली भूमिका ठाम ठेवली. जोपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त स्वतः येत नाहीत, आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, ही भूमिका घेत त्यांनी आपले आंदोलन चालूच ठेवले.

अखेरीस मराठी एकीकरण समिती नंतर मनसे आणि शिवसेनेने पुढे येऊन त्यांना पाठींबा दिला.

दरम्यान दुकानदाराला मनसेने चोपल्याचेही माहिती मिळाली आहे…..⭕

Previous article🛑 उदयनराजें बद्दल आठवलेंनी घेतली भुमिका 🛑
Next article🛑 *मास्क मिळणार अवघ्या तीन ते चार रुपयांत* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here