Home संपादकीय सुवर्णा सांळुखेंचा अनोखा कारनामा भाग -२

सुवर्णा सांळुखेंचा अनोखा कारनामा भाग -२

129
0

राजेंद्र पाटील राऊत

20230830_203329-BlendCollage.jpg

संपादकीय अग्रलेख….
सुवर्णा सांळुखेंचा अनोखा कारनामा भाग -२
वाचकहो,
आपल्याकडे एक म्हटलं जात “खोट बोल पण नीट बोल” कारण खोट आज ना उद्या चव्हाटयावर येतेच.पण..काही जणांना पावलोपावली खोटेपणा करण्याची परंपरा असते.
असाच प्रकार व-हाणेत सुध्दा घडला.व-हाणे गावात एक कागदोपत्री वाचनालय असून,त्याचा लाभ ना कधी गावातल्या वाचकांना झाला किंवा त्या वाचनालयात आजपर्यंत कुणी वाचनासाठी बसल्याचे आठवत नाही.पण…अनेक वर्षापासून या वाचनालयाचा संस्थाचालक शासनाच्या डोळ्यात धुळ फेकून शासकीय अनुदान मात्र वेळोवेळी लुबाडत आहे.अशी परिस्थिती व-हाणे गावात असतानाच सुवर्णा सांळुखे सारख्या ग्रामसेविका या गावाला सुवर्ण परिससारख्या मिळाल्यात.अन मग बघायचे कुठलेही कामच राहिले नाही.”अपना काम बनता,भाड मे जाये जनता” या न्यायाने सुवर्णा सांळुखेंनी गावचे “नऊ बारा पावणेतेरा” वाजवून ठेवलेत.तात्पर्य जे वाचनालय वर उल्लेख केल्याप्रमाणे कागदोपत्री अस्तित्वात असताना, सांळुखे मँडमाच्या सहकार्याने मात्र जिवंत झाले.ग्रामसेविका सांळुखे यांनी या “ग्रामपंचायतीचे की बोरसेचे वाचनालयाला” उदार हस्ते राजा हरिश्चंद्रासारखे गावठाणातील सुमारे एक गुंठा जागा अर्थातच १०८९ स्केअर फुट इतकी जागा बिनबोभाटपणे देऊन “रामहरी” केला खरा!पण..सदर जागेवर व-हाणे गावातील संपूर्ण सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी शासनाच्या निधीतून शोषखड्डा बनवला त्याच जागेवर वाचनालयाला जागा देण्याचा महापराक्रम सुवर्णा सांळुखे मँडमानी केला.वास्तवता खोट बोलायला मर्यादा असतात किंवा काही धरबंधन असतात मात्र सांळुखेनी मँडमानी सगळ्या मर्यादा ओलांडून व नितीधर्म सोडून बोगस व कागदोपत्री वाचनालयावर मेहेरनजर करत सरळ सरळ त्या वाचनालयास एक गुंठा जागेचा उतारा बनवून दिला अन वरुन सुवर्णा सांळुखेचा बहाणा सदरचे वाचनालय हे ग्रामपंचायतीचे आहे,पण त्याबाबत अधिकृत दस्तावेज मँडम देऊ शकल्या नाहीत.हे दुदैव! मग वाचनालय ग्रामपंचायतीचे की बोरसेचे याचाही पर्दाफाश लवकरच या स्तंभातून हौईल.तोपर्यंत फक्त प्रतिक्षा करा…एव्हढेच!

Previous articleचांदवड तालुक्यात वनविभागाच्या अधिका-यांकडून आदिवासींवर अन्याय
Next articleसुवर्णा सांळुखेचा अनोखा कारनामा भाग – ३
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here