Home Breaking News मालेगांव तालुक्यात सरपंच संघटनेचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा-अध्यक्ष भोसले

मालेगांव तालुक्यात सरपंच संघटनेचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा-अध्यक्ष भोसले

344
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20230902-WA0024.jpg

मालेगांव तालुक्यात सरपंच संघटनेचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा-अध्यक्ष भोसले
मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत)-नाशिक जिल्ह्यातल्या मालेगांव पंचायत समितीमध्ये तालुक्यातल्या सरपंचाना अपमानास्पद वागणूक देणे,व सरपंचानी आणलेल्या कामांना दिरंगाई करणे व यासारख्या अनेक प्रकारांना वैतागलेल्या सरपंचानी सामूहिक राजीनामे देण्याबरोबरच पंचायत समितीला टाळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा डाबलीचे सरपंच एकनाथ भोसले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.
भोसले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांच्याच शब्दात म्हटले आहे की,मालेगाव पंचायत समिती मधील १)एमआरजीएस विभाग २)संगणक विभाग व ३)बांधकाम विभाग याच्यामध्ये चालू असलेली मुजोरी व बेबंदशाही विरोधात सामूहिक राजीनामे व ठिया आंदोलन करण्याचे इशारा देण्यात येत आहे जेव्हा एक सरपंच आपल्या गावाच्या समस्या घेऊन पंचायत समितीमध्ये जातो किंवा मांडण्याचा प्रयत्न करतो किंव्हा विषय माडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस संबंधित विभागाकडून अरेरावीची व आपमानसपद भाषा वापरली जाते “खुर्ची आमच्या बापाची नाही कोणाच्या कामाची” अशी धारणा करून बसलेल्या उर्मट कर्मचाऱ्या विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे तरी दोन दिवसात योग्य निर्णय झाल्यास संबंधित विभागापुढे कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल व माननीय गटविकास अधिकारी साहेब यांच्याजवळ सामूहिक राजीनामे सादर करण्यात येथील.
गावाचे काम करताना सरपंचांना हातामध्ये कागद घेऊन फिरावे लागते सरपंचाकडून आलेल्या पहिलीचा निपटारा दोन दिवसात योग्य तो निर्णय घेऊन मी त्याला करणे आवश्यक असून सुद्धा एमआरजीस विभागात फाईल ढीग जमा झाले आहेत त्या फाईली किती दिवसात निकाली निघतील .२)सगणका ऑपरेटर दिवसभर bm ऑफिसला बसतो गावावर कामच करत नाही एक एक ऑपरेटर ५/५गावावर पत्नी. भाऊ.काका.मामा. याच्या नावाने काम केल्याचे दाखवतो ज्या व्यक्तीला रामराम लिहता येत नाही त्याच्या नावावर अर्थिक ग्रामपंचायत ची लुबाडणूक करतो याचा निर्णय व्हावा ३) बांधकाम विभागात पंधरा पंधरा दिवस फाईल सहीसाठी पडून राहतात कोणतेही उत्तर मिळत नाही .विचारण्यास गेल्यास अरेरावीची भाषा होते व अहिरे नामक व्यक्तीकडून फायलीना न स्वीकार न करण्याची बहिष्कार टाकण्याची धमकी दिली जात आहे अशा अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार यासाठीच आंदोलन करण्यात येणार आहे तरी सदर गोष्टीचा येथे एक दोन दिवसात निर्णय लागल्यास सदर विभागाला सरपंच महोदयाकडून कुलूप लावून व सामूहिक राजीनामे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे अशा या उन्मत्त कामचोर कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास व सरपंचांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल मुजोर कर्मचाऱ्यांच्या योग्य ती समज देऊन कारवाई न झाल्यास पंचायत समितीमध्ये आंदोलन करण्यात येईल संबंधित अधिकारी वर्गाने दखल घ्यावी व लवकरात लवकर सदर विषय मार्गी लावावेत अशी मागणी करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी . प समितीचे कामकाज बंद पाडण्यास भाग पाडू नये ही अपेक्षा सुध्दा भोसले यांनी व्यक्त केली आहे.तर दरम्यान तालुक्यातल्या विराणे येथील सरपंच नंदकिशोर सोनवणे यांना दोन दिवसापूर्वीच एका विस्तार अधिकाऱ्यांने अपमानास्पद वागणूक दिल्याने हे प्रकरण गटविकास अधिकारी भरत वेंदे यांचेसमक्ष सदर सरपंचाने आपली कैफीयत मांडताना रोखठोक व स्पष्टपणे सांगितले आहे.यावेळी गटविकास अधिकारी भरत वेंदे यांच्या दालनात माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा ध्यानध्यान,युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत,शिवसेना (शिंदे गटाचे) सुनील देवरे हे देखील उपस्थित होते हे विशेष.

Previous articleसुवर्णा सांळुखेचा अनोखा कारनामा भाग – ३
Next articleसरपंच सामूहिक राजीनामा प्रकरण;माजोरी अधिकाऱ्यांचा माज उतरवलाच पाहिजे!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here