🛑 आज ६ जुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 🛑
💐🚩युवा मराठा न्युज तर्फे सर्व शिवभक्तंना शिवमय शुभेच्छा💐🚩
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
महाराष्ट्र :⭕शिवरायांनी ६ जून १६७४ रोजी शिवरायांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्यभिषेक सोहळा करून घेतला. तिथीप्रमाणे येणारा राज्याभिषेकाचा दिवस दिवस ४ जूनला, तर तारखेप्रमाणे हा दिवस ६ जूनला साजरा केला जातो.
शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात प्रभाव करते. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त आज आपण या लेखातून शिवरायांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातले नव्हे, तर भारतातले उत्कृष्ट योद्धे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
शिवराय हे दयाळू शासक म्हणून ओळखले जात असतं. ते शत्रूंच्या प्रजेसोबत कधीही चुकीचा व्यवहार करणार नसतं. शिवरायांनी लढाईत पकडण्यात आलेल्या कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ दिला नाही.
शिवाजी महाराजांनी नवीन युद्ध शैली आत्मसात केली होती. गनिमी काव्याच्या सहाय्याने त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. आज हाच गनिमी कावा सर्जिकल स्ट्राईक म्हणून ओळखला जातो.
शिवराय शूर रणनीतिकार होते. शिवाजी महारांजाना सर्वात अगोदर नौसेनेचं महत्त्व समजलं होतं. त्यामुळे त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांमध्ये नौसेनाची स्थापन केली होती.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचा ध्वज भगवा असला, तरी ते कोणत्याही धर्माविरोधात नव्हते. विशेष म्हणजे त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते. शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केले. यात प्रत्येक धर्माला महत्त्व होते.
शिवाजी महाराजांनी आपल्या युद्ध नितीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. आज हे सर्व किल्ले ऐतिहासीक वारसा स्थळ म्हणून घोषीत करण्यात आले आहेत.
शिवाजी महाराजांनी प्रतापगड आणि रायगड किल्ले जिंकल्यानंतर रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले.⭕