• Home
  • भावडबारी घाटात ट्रॅक्टर पलटी अपघातात तीन जण ठार*

भावडबारी घाटात ट्रॅक्टर पलटी अपघातात तीन जण ठार*

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
*भावडबारी घाटात ट्रॅक्टर पलटी अपघातात तीन जण ठार*

देवळा-नाशिक रस्त्यावरील भावडबारी घाटात ट्रॅक्टर पलटी झाल्याने अपघात झाला असून या अपघातात तीन जण ठार झाले असून यामध्ये एका लहान मुलाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
चांदवड तालुक्यातील पुरी येथील ट्रॅक्टर शेतीकामासाठी देवळ्याचे दिशेने येत असताना भावडबरी घाटात उतारावर ट्रॅक्टर पलटी झाला या ट्रॅक्टर मध्ये ९ जण असल्याची माहिती मिळत असून यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून एकाचा उपचारादारम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे तर सहा जण जखमी असून त्या जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत्यूमध्ये एका महिलेचा तर एका लहान मुलांचा तर एका पुरूशाचा समावेश आहे.

anews Banner

Leave A Comment