Home संपादकीय सरपंच सामूहिक राजीनामा प्रकरण;माजोरी अधिकाऱ्यांचा माज उतरवलाच पाहिजे!

सरपंच सामूहिक राजीनामा प्रकरण;माजोरी अधिकाऱ्यांचा माज उतरवलाच पाहिजे!

207
0

राजेंद्र पाटील राऊत

20230902_184136-BlendCollage.jpg

संपादकीय अग्रलेख…
सरपंच सामूहिक राजीनामा प्रकरण;माजोरी अधिकाऱ्यांचा माज उतरवलाच पाहिजे!
वाचकहो,
मालेगांव तालुक्यातील सरपंच सामूहिक राजीनामा देतील,असा इशारा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ भोसले यांनी दिलाय.सामूहिक राजीनामा देण्यासोबतच पंचायत समिती कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन छेडण्याचा निर्णयही सरपंचाना घ्यावा लागतो,म्हणजे या प्रकरणात नक्कीच मोठे रहस्य दडलेले आहे.सरपंचाना अधिकाऱ्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक,जेथे सरपंचानाच कामासाठी अडविले जाते.तेथे सामान्यांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेलाच बरा!गत काही दिवसापूर्वीच विराणेचे सरपंच नंदकिशोर सोनवणे यांना एका जबाबदार विस्तार अधिकाऱ्यांने दिलेली अपमानास्पद वागणूक अन त्यानंतर सबंधीत सरपंचाने गटविकास अधिकारी वेंदे समोर मांडलेली कैफीयत बरंच काही दर्शवून जाते.
खरं तर मालेगाव तालुक्यात अधिकाऱ्यांवर कुणाचा धाक व वचकच राहिलेला नाही.सगळा माजोरीपणा सुरु आहे.मंत्र्याच्या नावाखाली उघड उघड अधिकारी जनतेला वेठीस धरत असल्याचा प्रकार कित्येकदा घडला आहे.तरीही सारेच आलबेल…अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा सोडून त्यांना एक वेगळाच रोग जडला आहे.पडद्यामागून राजकारण खेळण्याचे हे उद्योग जेव्हा जबाबदार अधिकारी करायला लागतात.तेव्हा सामान्य जनतेच्या हक्काला कवडीमोल महत्त्व उरते.तस बघितले तर या तालुक्याची पुर्ण भट्टीच बिघडलेली आहे.वर्षानुवर्षे एकाच जागेवर खुर्च्या उबविणा-या या अधिकाऱ्यांना कुणाचा पायपोस व धरबंधन राहिलेले नसल्यामुळे ते राजकारण करायला लागलेत.आणि गावचा सरपंच म्हणजे गावातील संसदेचा प्रमुख असतानाही त्यांच्याशी अरेरावीचे वर्तन करुन अपमानास्पद वागणूक देण्याचे हे बेशिस्त वर्तन अधिकारी कुणाचे आशिर्वादाने करीत आहेत.एकदा त्याचाही खुलेआम जगजाहिर पंचनामा झालाच पाहिजे.या माजोरी माजाटलेल्या अधिकाऱ्यांचा गाँडफादर पडद्यामागील बोलविता धनी कोण? या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेताना,माजोरी अधिकाऱ्यांचा माज उतरवलाच पाहिजे.एव्हढेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here