Home Breaking News 🛑 पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं….! अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा 🛑

🛑 पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं….! अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा 🛑

113
0

🛑 पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं….! अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा 🛑
✍️इस्लामाबाद 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

इस्लामाबाद :⭕ पाकिस्तानचा (Pakistan) प्रसिद्ध आणि आघाडीचा मीडिया हाऊस असलेल्या डॉन न्यूजची (Dawn News) वृत्तवाहिनी रविवारी दुपारी हॅक झाल्याचं म्हटलं जात आहे. या वृत्त वाहिनीची संपूर्ण सिस्टम हॅक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे वृत्तवाहिनी सुरू होती..

त्यानंतर अचानक प्रसारण थांबलं आणि तिरंगा (Indian Flag) झळाऴू लागला. या तिरंग्यासह स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा (Happy Independence Day) मेसेज होता अशी माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहेत.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिस्टम हॅक करण्यामागे हॅकर्सचा हात असू शकतो.

यासंबंधी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती डॉनने एका निवेदनातून जारी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या डॉन न्यूज चॅनलवर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जाहिरात सुरू होती.

त्याचवेळी अचानक जाहिरात थांबली आणि भारताचा झेंडा फडकू लागला. ज्यावर स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा असा मेसेज लिहिला होता.

यापूर्वीही भारतीय हॅकर्सकडून अशा प्रकारे सिस्टम हॅक झाल्याची घटना घडली असल्याचा आरोप डॉन न्यूज चॅनलकडून करण्यात आला आहे.

भारतीय हॅकर्स चॅनेलच्या यंत्रणेवर हल्ला करत आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा चॅनलमधील इतर लोकांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.

काही मिनिटांत चॅनल पुन्हा सुरू झाला. या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे….⭕

Previous article🛑 खुशखबर….! ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या….! सिरम इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी 🛑
Next article🛑 माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here